…अनं कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा ; कथा त्या दोन मित्रांची
कथा – कुटिलता भरी झूठी मुस्कान, बन अंतरंग जताते एहसान। फेंक, फरेबी,कपटी पाशा छली मित्र देते हैं झांसा। मूल्यो को करते तार तार धोखा देते बारबार॥ धूर्तता के निकृष्टतम मंजर, पीठ पीछे से भोकते खंजर।। कपटी मित्रावर आधारित विजय बहादुर तिवारी यांचे हे काव्य आज चांगलेच गाजत आहे.
मैत्री हा एक महान आशीर्वाद आहे. प्रत्येकजण भाग्यवान नसतो ज्याच्याकडे ती असते. जीवनाच्या प्रवासात आपण बर्याच लोकांना भेटतो पण असे काही लोक आहेत जे आपल्यावर एक अजबच छाप पाडतात. मात्र आजच्या या जगात खरा मित्र मिळणे फारच कठीण झाले
ते म्हणतात ना की “ज्याचे मित्र नाही तो खूप दुखी असतो, परंतु कपटी मित्र असण्यापेक्षा नसलेलाच बरा”. खरे मित्र आपले दुःख वाटून घेतात व आपला आनंद गगनाला भिडवतात. खरे मित्र बनवावे लागत नाही ते आपोआप स्वभावाने बनून जातात हेच खरे. अश्या मित्रासोबत मित्रता दिवसेदिवस वाढतच जाते. पण आज असे मित्र भेटणे भाग्यच मानावे लागेल.
गोष्ट आहे त्या दोन मित्रांची एक म्हणजे जितेंद्र आणी दुसरा असतो सुरेंद्र या दोघांची यारी न्यारीच होती. मात्र ऐकें दिवशी त्या दोघांच्या यारीत मोह, लालसा आणी अस्तित्वाच्या मीठाचा खडा पडला,
खरं तर जितेंद्र हा मैत्री निभविनारा मित्र बरं का, सुरेंद्रच्या प्रत्येक सुख दुःखात जितेंद्रचा वाटा. त्याच्या प्रत्येक संकटाच्या वेळी जितेंद्र उभा असायचा. या दोघात फरक एवढाच होता की सुरेंद्र हा गावात प्रसिद्ध होता. त्याचं नावं होतं, त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत होती. ऐकें दिवशी अनेक दिवसांपासून स्वतःच्या टाचा जीजवत मेहनत करणाऱ्या जितेंद्रनीं यशाची पहिलीच पायरी चढली. परंतु ते म्हणतात ना कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा. कारणं यशाची पहिली पायरी चढताच सुरेंद्र ने जितेंद्रच्या यशाला सुरुंग लावण्यास सुरवात केली होती. बैठका घेऊन कटकारस्थान शिजवले जात होते.
मात्र गुन्हेगार कितीही अट्टल असला तरीही तो काही ना काही पुरावे सोडतोच आणी तेच सुरेंद्र सोबत झाले. जितेंद्रच यश पचन न होणाऱ्या सुरेंद्र ने एका भर कार्यक्रमात खिल्ली उडवली ती जितेंद्रच्या यशाची. आणी तेव्हापासुन लांब झाले हे मित्र. कोणतीही चौकशी न करता आपली खिल्ली उडवली गेली हे ऐकून बाजूला पडला तो म्हणजे जितेंद्र. पण एखाद्याने खिल्ली उडवली म्हणून तु मैत्रीवर संशय व्यक्त केला.असं जितेंद्र ला समजावून सांगण्याचा काहींनी प्रयत्न केला अन शेवटी जितेंद्र म्हणाला कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
आजच्या जगात मैत्री ही फ़क्त स्वार्थ काढण्यासाठी केली जाते अशी भावना सर्वांचीच. आणी ती भावना खरी देखील आहे. त्याला कारणं म्हणजे मोह. आज मोह आणी लालसे पोटी मित्र हा फ़क्त नावारुपाला राहिला आहे. काम असेल तर गोड बोलून काम काढणे एवढेच नाही बरका. आजचा कपटी मित्र हा रात्र दिवस टाचा जीजवुन यशाच्या शिखरावर जाणाऱ्या आपल्याच मित्राला खाली खेचण्याकरीता बैठका घेऊन कटकारस्थान करतांना देखील दिसत आहे. म्हणूनच आजच्या या जगात खरा मित्र मिळणे फारच कठीण झाले एवढेच
संपादक
जावेद शकूर