अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील दोन दिग्गजांचा वाद अजित पवारांच्या बंडानंतर मिटण्याचि शक्यता व्यक्त केली जात आहे. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. विद्यमान खासदार सुजय विखेपाटील यांना काटे कीं टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके मैदानात उतरले होते. मात्र अजित पवारांनी बंड करत भाजपाल पाठिंबा दिल्याने लोकसभेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेले सुजय विखेपाटील आणी निलेश लंके यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
रविवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत भाजपाला पाठिंबा दीला दरम्यान भाजपाने दादांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत असलेले आमदार निलेश लंके आता ‘ देवेंद्रवासी’ झालें आहे.? तर भाजपात असलेले खासदार सुजय विखेपाटील यांना ताकद म्हणा किंवा दिलासा मिळाला आहे.
वास्तविक पाहता विखेपाटील कुटुंबीय आणी पवार कुटुंबीय यांच्यातील काटे कीं टक्कर हि सर्वश्रुत आहे. खासदार सुजय विखेपाटील यांनी खासदारकीसाठी कॉंग्रेस सह राष्ट्रवादी कॉंग्रेसची देखील दार ठोठावली होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सुजय विखेपाटील यांना बाहेरचा रास्ता दाखविल्याने अखेरकार विखे पिता पुत्रांनी कॉंग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान लोकसभा निवडणूकीत देखील खासदार सुजय विखेपाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आमदार संग्राम जगताप यांना उभे केले होते मात्र सुजय विखेपाटील यांनी जगतापांचा पराभव केला होता. त्यावेळी मात्र झालेला पराभव हा संग्राम जगताप यांचा नव्हे तर पवारांचा पराभव मानला गेला होता.
आता पुन्हा येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाचे खासदार सुजय विखे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या ताकदीने आमदार निलेश लंके यांना उभा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाचा होता? मात्र ऐनवेळी अजित पवारांचे समर्थक असलेले निलेश लंके यांनी पवारांसोबत बंडात सामील झाल्याचे बोलले जात आहे ? त्यामुळेच एकमेकांसमोर उभे राहिलेल्या कट्टर विरोधकांच्या कडू राजकारणाचा शेवट काही काळासाठी का होईना गोड होतो कीं आणखीन काही भूकंप होणारं याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच लक्ष लागलं आहे एवढेच…!