अहमदनगर – अहमदनगर शहरात सध्या दोन गटात धुमश्चक्री होत आहे. याबाबत दोन्ही गटांवर पोलीस गुन्हे दाखल करताहेत मात्र होत असलेल्या दाखल गुन्ह्यामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची पद्धत हि चुकीची असल्याची मागणी एका समाजातून व्यक्त होत आहे. अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसापासून शुल्लक शुल्लक कारणावरून वाद विवाद होत आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या नावाखाली पोलीस प्रशासन देखील कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल करताना दिसत आहे.!
एकीकडे स्वतः न्यायालयाने सांगितले आहे कि १०० दोषी सुटले तरी चालेल मात्र एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये मात्र असं न करता अहमदनगर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या नावावर कोणतीही शहानिशा न करता निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन गेल्यास आम्हाला तेवढेच काम आहे का. निर्दोष जरी असला तरी तुम्ही न्यायालयात दाद मागा अशी प्रतिक्रिया पोलीस विभागाकडून देण्यात येते. दरम्यान न्यायालयाच्या खेटा मारणारा अखेर कार न्यायालयातून निर्दोष मुक्त झाल्यास पोलिसांवर त्यांनी केलेल्या खोट्या गुन्ह्याची कारवाई मात्र होताना दिसत नाही तात्पर्य पोलिसांच्या हातून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात येते? असे अहमदनगर शहरात दबक्या आवाजात बोलले जात आहे. असं असले तरी याला जबाबदार कोण आता हाच प्रश्न उपस्थित होत आहे. एका विशिष्टि समाजात जन्माला आलो म्हणून ते समाज कि त्या समाजात जन्मलो म्हणून त्रास देणारी यंत्रणा !
असो,परंतु पोलिसांच्या चौकशी न करता करण्यात येणाऱ्या दाखल गुन्ह्या संदर्भात नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे !. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना घाबरणाऱ्या, तसेच अन्याय सहन करणारे नागरिक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद घड्वफिण्याचे काम केले. पोलिसांप्रती नागरिकांमध्ये असलेली ढगाळलेली प्रतिमा पुसून काढण्यासाठी एक ना अनेक कार्यक्रम त्यांनी राबविले, शहरातील समाजसेवक,उद्योगपती, साहित्यक धर्मगुरु यांचे त्यांना सहकार्य देखील मिळाले. परिणामी अहमदनगर जिल्ह्यातुन जातीयवाद संपुष्टात आला आणि खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना नागरिकांचीच मदत मिळाली. मात्र सध्या अहमदनगर शहरात तसं होताना दिसत नाही. या उलट वाद विवाद झाला अन विवाद करणाऱ्यांनी ते वाद मिटविण्याचा प्रयत्न केला तर पोलिसच बाळाचा वापर करत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडत आहे. एवढेच नाही तर विवाद झाल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या नावाखाली व दबावाखाली म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही अश्या पद्धती नुसार काम करताहेत.
त्यामुळे सध्याच्या जिल्हा पोलीस प्रमुख यांनी कोणत्याही प्रकरणात योग्य चौकशी किंवा योग्य शहानिशा करून गुन्हे दाखल करवून घेण्याच्या सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यास नागरिकांमध्ये तात्कालिनन पोलीस अधीक्षक मनोज पाटलांनी तयार केलेली स्वच्छ प्रतिमा ढगाळल्याशिवाय राहणार नाही एवढेच?