अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे गेल्या काही दिवसापूर्वी अशरफची हत्या करण्यात आली होती हत्या करणारा दुसरा कोणी नव्हे तर त्याचाच चांगला मित्र होता. आता अशरफ नंतर जामखेड मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली मात्र या दोन्ही घटनेसह इतरत्र घटना बघितल्या तर ते विचारताहेत आम्हीच का ? अकोले नंतर जामखेड मध्ये घडलेली घटना हि एका विशिष्ट समाजातील होती, एका विशिष्ठ समाजातील घटना असल्याने त्याकडे मीडियासह प्रशासन देखील दुर्लक्ष करत मात्र जर हीच घटना उलट झाली असती व आरोपी एका विशिष्ठ जाती धर्माचा असला असता तर आत्ता पर्यंत रान पेटविण्यात आले असते मग हा दुजाभाव का? खरंतर मुसलमानच्या घरात जन्माला येणे किंवा मुसलमान होणे हि चूक आहे का. एका विशिष्ठ समाजावर अत्याचार झाला तर कोणी पाहत नाही मग आम्ही भारतीय नाही का कदाचित हाच प्रश्न अशरफ आज स्वर्गातून विचारात असेल.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहणाऱ्या अशरफचे सर्व मित्र हिंदू होते. त्याची मैत्री साहिल नावाच्या एका हिंदू सोबत होती ते दोघे राहणारे देखील शाहूनगर परिसरातीलच होते मात्र जेव्हापासून अकोल्यात लव्ह जिहादचा प्रश्न निर्माण झाला तेव्हापासून त्यांच्यात फार काही जवळीक राहिली नव्हती आणि अखेरकार एक दिवस अचानक साहिलने अशरफला दुचाकीवर बसविले आणि थेट गर्दनी घाटात नेले आणि तिथे साहिल मोहितें याने आपल्या साथीदारासोबत अशरफची हत्या केली. मात्र यात अशरफची काय चूक होती. हे अद्याप कळालेले नाही. एवढेच नाही तर गेल्या दोन दिवसापूर्वी जामखेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला मात्र ती मुलगी एका विशिष्ठ समुदायाची असल्याने प्रकरण फक्त जामखेडपुरतेच मर्यादित राहिले.आज पहिले तर अशरफ असो किंवा एका विशिष्ठ समाजाच्या कोणत्याही अन्याय ग्रस्त माणसाला न्याय मिळले कठीण झाले आहे?. एखाद्याने केलेल्या चुकीला संपूर्ण समाज जबाबदार कसा असू शकतो हे समजण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा गेल्या दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेप्रमाणे भारतात समाजाची दुफळी निर्माण होण्यास जास्त वेळ लागणार नाही?
महाराष्ट्र राज्य असो किंवा देशात कुठेही आरोपीच्या पिंजऱ्यात मुसलमान नावाचा शब्द कानावर पडताच पिसाळलेल्या कुत्र्यासारखे आपले तथाकथित भुंकायला लागते मात्र याचा परिणाम समजावर, व्यक्तींच्या मनावर काय होई याचा आजतरी कोणी विचार करतांना दिसत नाही. आज मुस्लीम समाजासह अल्पसंख्याक समाजावर म्हण्टल्यास वावगं ठरणार नाही मोठ्या प्रमाणावर अधिकृत व अनाधिकृत हल्ले होताना दिसत आहे? या संदर्भात गेल्या ९ वर्षांपासून सत्तेत बसलेले पंतप्रधान देखील कुठलाही ब्र शब्द काढायला तयार नाही मात्र याच मुस्लिम म्हणा किंवा अल्पसंख्याक यांची दखल चक्क परदेशीय मीडियाने घेतल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून ब्र शब्द न काढणाऱ्या पंतप्रधानांना चक्क मुस्लिम व अल्पसंख्याक समाजाविषयी प्रश्न विचारण्यात आला मात्र भारतात भेदभाव नसल्याची प्रतिक्रिया आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दिली. त्यामुळे जर देशात भेदभाव जातीयवाद नाही तर मुस्लिम समजाला टार्गेट करणाऱ्यांना पाठीशी कोण घालत आहे ? खरंतर हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. देश सोडा आज माझ्या महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या संशयावरून एका अशरफची हत्या करण्यात आली खरंतर याला जबाबदार कोण ? ज्याने अशरफची हत्या केली, हत्येचा पूर्वनियोजित कट रचला तो हत्यारा अशराफचा मित्र असताना देखील त्याची अशरफ विरोधात माथी भडकावली कोणी जर याचा विचार केला तर हे थोतांडं फक्त येणाऱ्या निवडणुकीसाठी तर होत नाही ना ? हा प्रश्न आता समोर येत आहे त्यामुळे जाती जातीत, धर्मा धर्मात द्वेष पसरविणाऱ्या राजकारण्यांना आता जागे होऊन अद्दल घडविण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या प्रतिक्रियांनुसार भारतात हिंदू मुसलमान दुफळीतून विभाजन होण्यास वेळ लागणार नाही आणि याला जबाबदार फक्त माथे भडकाविणारेच असतील एवढेच