अहमदनगर – अहमदनगर शहरामध्ये दिवसेंदिवस वातावरण दूषित होतं चालला आहे. याला नेमकं जबाबदार कोण हाच प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना पडला असून दूषित होणाऱ्या वातावरणाबाबत पोलिस अधीक्षक काय कठोर भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये रोज छोट्या मोठ्या कारणांमुळे वातावरण बिघडत चालला आहे. एखादी छोटीशी घटना जरी घडली तरी त्याला जातीयवादी रंग देऊन पोलिस ठाण्याच्या दारी लोंढेच्या लोंढे जमा होतांना दिसत आहे. याला नेमकं जबाबदार कोण. पालक कीं पोलिस हाच खरा प्रश्न उपस्थित होतं असून याबाबत पोलिस अधीक्षकांनी आता कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याच मतं सर्वसामान्यामधुन व्यक्त केल जात आहे.
शहरात दहशत माजवणे, जातीय तेढ निर्माण करने, सोशल मीडियाचा गैरवापर करने अश्या घटना घडत आहे. एखादी घटना घडली तर त्या घटनेला जातीयरंग देऊन शहरातील १८ ते २५ वयों गटातील तरुणांई कोणताही वीचार न करता आपला आयुष्य उध्वस्त करायला निघाले आहे. या १८ ते २५ वयों गटातील तरुणांईचे माथी कोण भडकवत आहे याचा देखील वीचार पोलिसांनी करून अश्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील सर्वसामान्या मधुन व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर शहरामध्ये ४ पोलिस ठाणी आहे. या चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोज छोट्या मोठ्या घटना घडतात मात्र एखादी घटना घडली कीं अवघ्या १० ते १५ मिनिटात लोंढेच्या लोंढे कसे जमा होतात, याची दखल सायबर पोलिसांनी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
एकीकडे जमा झालेल्या १०० ते २०० जणांचा ताफा धार्मिक घोषणा देत कायदा व सुव्यवस्था बिघडवीण्याचा प्रयत्न करतो तर दुसरीकड़े भर बाजारातील किंवा उपनगरातील हातावर पोट भरणाऱ्यानां, दुकाने बंद कर म्हणतं पोलिसांच ऐकाव लागत? आणी अशा वातावरणात उध्वस्त होतो तो फ़क्त आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगि भागवीणारा सामान्य माणुस.
शहरामध्ये उतपात माजवीणाऱ्या गुंडांचा तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी चांगलाच बंदोबस्त केला होता. शहरात जातीयतेढ निर्माण करने, गुंडगिरी करने, दहशत माजवीने अश्या लोकांवर पाटील यांनी डायरेक्टर मोक्काचीच कारवाई केली होती. अशीच काहीशी कारवाई शहराचा वातावरण बिघडविणाऱ्या दोन्ही समाजातील तथाकथित धर्माच्या ठेकेदारांवर सध्याचे पोलिस अधीक्षक ओलाहे करतील का? जर पोलिसांचा त्या ठेकेदारांवर खरंच जरब बसला तर अभिनंदनच मात्र शहराचा वातावरण असाच भयभीत आणी दूषित राहिल्यास पोलिस अधीक्षक ओला यांना शहरातील वातावरणच आव्हानात्मक ठरले यात मात्र शंका नाही हेच विशेष!
[संपादक | जावेद शकूर ]