Ahmednagar | पोलीस हा माणूस नाही का तो जरी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असला तरी शेवटी तो माणूसच आहे ना, शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासह राजकारण्यांच्या सभा, मोर्च्याचे बंदोबस्त यासह आरोप करणाऱ्या राजकारण्यांवर कोणी हल्ले करू नये यासाठी त्या राजकारण्यांच्या जीवाची परवा हा एक पोलीसच करत असतो. मात्र अहमदनगर शहरातील गढूळ झालेल्या वातावरणाने पोलिसांना देखील टार्गेट करण्याचे काम सुरु केले आहे का ?. एखादया विशिष्ठ समाजाच्या सण उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी असलेल्या बंदोबस्तात अधिकारी गजेंद्र इंगळे यांनी समाजाच्या आग्रहाखातर थोडा का होईना मन मोकळा करण्याचा आनंद लुटला मात्र राजकारण करणारे नितेश राणेंनी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी गजेंद्र इंगळे यांच्या काही क्षणासाठी साजरा केलेल्या आनंदावर विरजण टाकून स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम केले ? एकंदरीत असेच काहीसे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
विधानसभेचा अधिवेशन हा सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, सरकारकडून विविध कामांना होत असलेल्या दिरंगाईबाबत विचारणा करण्यासाठी, बेरोजगारी, महागाई, यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी असतो मात्र सध्या अधिवेशनात नवीन पायंडे पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वतः सत्ताधारी पक्षात बसलेले आमदार सर्व सामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडून कोण कुणासोबत नाचत होता होता यावर लक्षवेधी मांडत आहे. अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं बिनधिक्कत पणे विचारणारा या पुरोगामी महाराष्ट्रात कोणी आहे कि नाही हाच प्रश सर्वसामान्य सुशिक्षित जनतेला पडला आहे.
खरंतर विधानसभेच्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी गजेंद्र इंगळे यांचे नाव एका गुंडा सोबत जोडले. त्यामध्ये जर पाहिले तर विशिष्ठ समाजाचा सण उत्सव हा समाजाचा असतो कोणी एका गाव गुंडाचा नाही. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी इंगळे हे विशिष्ठ समाजाच्या उत्सवात सामील झाले तर यात चुकलं कुठं, मात्र गुंडासोबत नाचला असं लक्षवेधी नितेश राणे हे मांडत असतांना ३०७ सारख्या कालमाअंतर्गत असलेल्या त्या गुंडाचा तडीपार का काढला गेला नाही, यावर विधानपरिषदेच्या अध्यक्षाच लक्ष वेधणे गरजेचे होते. कोणत्याही धार्मिक उत्सव किंवा मिरवणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गाव गुंडांवर तडिपाराची कारवाई करण्यात येते मग याची का नाही कदाचित्र हा प्रश्न उपस्थित करणे गरजेचे होते मात्र त्या गुंडाच्या खांद्यावर बंदुक ठेवून पोलीस अधिकारी गजेंद्र इंगळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली हे कितपत योग्य ?
आज अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे अधिकारी विराजमान झाल्यापासून तर आज तागायत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही याउलट आपल्या माध्यमातून लव्ह जिहादासारख्या घटना रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नां सारखे प्रयत्न आज कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहे. कायदा व सुव्यवस्थेसह आपल्यासारख्या राजकारणी नेत्याचे सभा, मोर्चे या सर्व गोष्टीचे बंदोबस्त सांभाळून प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन आपल्या माता भगिनींना छेडछाडीविरोधात न घाबरता निर्भयपणे तक्रार कारण्यासाठी आवाहन करत आहे .आणि त्या आवाहनाला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे
मात्र आपण विधानसभेच्या अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नाबाबत अधिक माहिती घेणे गरजेचे होते. आज आपण सत्ताधारी पक्षातील आमदार आपले नेते तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहविभागाचे प्रमुख त्यामुळे राज्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हा आपलाच कुटूंबाचा सदस्य. असं असतांना देखील आपण आपल्या सत्तापक्षातील गृह खात्याची आबरू चव्हाट्यावर काढता हे कितपत योग्य ? आज आपण अधिवेशनात ज्या गुंडाचा नाव घेतला आम्ही त्या गुंडाच्या समर्थन करत नाही चुकीच्या गोष्टीचा NEWS ALERT कधी समर्थन करत नाही आणि करणार हि नाही आणि आम्ही अश्या गुंडाना भीक देखील घालत नाही. मात्र गुंडांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एखाद्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा राजकारणासाठी नाहक बळी देणे हे कितपत योग्य आहे अशी चर्चा अहमदनगर शहरात होत आहे.
असो आम्ही नगरकर आपल्या मागणीनंतर फक्त एकच प्रार्थना करू शकतो कि आपल्या राजकारणाच्या खेळात इंगळे सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा बळी जाऊ नये एवढेच. मात्र आज लव्ह जिहाद व धर्मांतर सारख्या प्रश्नासह सर्व सामान्यांचे प्रश्न देखील आपण तितक्याच पोटतिडकीने मांडाला हीच अपेक्षा, आज अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याचं मुख्य केंद हे अहमदनगर शहर आहे मात्र या शहरात रस्ते तर सोडा साधी कचऱ्याची घंटा गाडी देखील दररोज येत नाही अश्या मूलभूत प्रश्नांना आम्ही नगरकरांनी जायचं कुठे हा देखील गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे त्यामुळे आपण अहमदनगर जिल्ह्यात लक्ष घातल्याने लाव्ह जिहाद सारखे प्रश्न सुटतीलच मात्र आपण आमच्या मूलभूत प्रश्नांना देखील हात घालावे एवढीच एक नगरकर म्हणून अपेक्षा…..