अहमदनगर – अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार जातीयवादी घटना घडत आहे. दरम्यान घडलेल्या घटनेमध्ये दोन्ही गटांवर पोलीस गुन्हे दाखल करताहेत खरे, मात्र शहराला लावण्यात येणारी जातीयवादाची कीड आता समूळ नष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे अशी चर्चा व्यक्त होत असताना नागरिक आता पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित करत आहे. शहरात वारंवार घडणाऱ्या घटनांना जितके जबाबदार पालकवर्ग आहे तितकेच जबाबदार पोलीस प्रशासन असल्याची चर्चा देखील आता प्रत्येक चौकाच्या कट्ट्यावर सुरु झाली आहे. काही दिवसापूर्वी सिंघम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटात अभिनेता म्हणतो कि पोलिसांनी मनावर घेतल्यास मंदिरासमोरून कोणी एक चप्पल देखील चोरून नेऊ शकत नाही. मात्र शहरात जे वातावरण तयार करण्यात आला आहे ते या डायलॉगच्या विपरीत आहे हे मात्र नक्की. दरम्यान सिंघम या चित्रपटामधून आपण काय बोध घेतला तर फक्त पोलीस अधिकाऱ्यांच्या कौतुकासाठी त्यांना सिंघम नावाची पदवी दिली मात्र त्या सिंघम प्रमाणे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार कोण आता हाच खरा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांच्या कर्तव्यात सर्वात महत्तवाची जबाबदारी म्हणजे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करणे आहे, मात्र आज अहमदनगर शहरात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटना घडल्यावर गुन्हे दाखल करून आरोपीना शोधण्याचे काम करत आहे एवढेच, आज अहमदनगर शहराच्या दोन्ही समाजातील तरुण युवक ज्यांना नीट धुवण्याची व संसार चालविण्याची जबाबदारी पार पाडता येत नाही अश्या कोवळ्या युवकांची मने दूषित करून जातीयवादाचे विष त्यांच्या मनात पेरण्याचे काम चालू आहे, मात्र पोलिसांची गोपनीय शाखा मूग गिळून गप्प बसलीय ? हा खरा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
कारण रविवारी शहराच्या महेश चित्रपटगृहा जवळ अमन शेख या युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. एकट्या अमनला घेराव घालत त्याच्यावर हल्ला केला गेला सुदैवाने त्या हल्ल्यात अमन हा थोडक्यात बचावला मात्र हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वीच अमनने मला धमकी दिलीय जात असल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या धमकीची ऑडियो रेकॉर्डिग जी व्हायरल झाली होती ती ऑडियो रेकॉर्डिग उपलब्ध असताना देखील पोलिसांना संबंधित आरोपीची साधी चोकशीहि करता आली नाही हे विशेष, अमनने ज्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्याचवेळी त्या तक्रारीतून जातीयवादाचा वास येत असताना पोलिसांना मात्र तो वास म्हणा किंवा जातीयवादाची चाहूल देखील लागली नाही हेही विशेष नाही का, मग पोलिसांच्या या भूमिकेबाबत नागरिकांनी काय बोध घ्यायचा…!
आज अहमदनगर शहरात ज्या पद्धतीने जातीयवादाचा विष तरुण युवकांच्या मनात पेरण्याचे काम चालू आहे ते वादळापूर्वीची शांतता नाही का याचा उत्तर नगरकरांना कोण देणार ओला साहेब…! आज ज्या पद्धतीने शहराचा वातावरण दूषित झालं आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटूंब देखील संध्याकाळी ७ च्या नंतर घराबाहेर पडण्यास भित आहे. मग याला जबाबदार कोण, आज तरुण युवकांचे माथी भडकविण्याचे काम कोण करत आहे हे तुमच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या गोपनीय विभागाला माहीत नसावे हे नवलच नाही का, असं असताना देखील आपलं पोलीस विभाग जातीयवादाच्या झाडाला मुळापासून उपटण्याऐवजी त्या जातीयवादाच्या झाडांला खत पाणी घालत तर नाही ना अशी शंकाच सर्वसामान्यांच्या मनात घर करत असून पोलिसांनी वेळीच अश्या संघटित गुन्हेगारांचा मोक्का प्रस्ताव तयार करून त्यांना ठेचण्याची गरज आहे अन्यथा शहरात येणाऱ्या सुनामीच्या लाटा शहराला वाहून नेल्याशिवाय राहणार नाही, व त्या सुनामीच्या येणाऱ्या लाटेमुळे हातावर पोट भरणाऱ्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही एवढेच