मुंबई – भारत हा सण आणि उत्सवांची भूमी आहे असे मानले तरी वावगे ठरणार नाही. भारतात विविध धर्माचे आणि परंपरेचे लोक एकत्रितपणे राहतात आणि भारतात साजरे केले जाणारे विविध सण उत्सव हि समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिब दर्शवितात. मात्र मुबईच्या मीरारोड परिसरातील एका सोसायटीत मुस्लिमांच्या बकरी ईदला विरोध करण्यात आला आहे. एकीकडे बकरी ईदच्या दिवशी पवित्र असलेलया आषाढी एकादशी निमित्त बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाज घेत आहे. तर दुसरीकडे बकऱ्याची कुरबानी तर लांबच फक्त घरात बकरा आणला म्हणून चक्क आंदोलन करण्यात आले, घोषणाबाजी देण्यात आली. हि कोणती मानसिकता ? मुंबई येथील मीरारोड परिसरात जेपी इंफ्रा सोसायटी मध्ये राहणाऱ्या मोहसीन खान ने कुरबानीसाठी सोसायटीत बकरा आणला मात्र सोसायटीत बकरा आणल्यामुळे संतप्त सोसायटीच्या लोकांनी मोहसीनच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलन केले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलन करणाऱ्या ८ ते १० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे तर पोलिसांनी सोसायटी मधील मोहसिनच्या बकऱ्यांना सोसायटीतून बाहेर काढले आहे.
दरम्यान बुधवारी सकाळपासून बकऱ्याला विरोध करण्यात आला. भारत हा एक असा देश आहे जेथे सर्व धर्म आणि समाज त्यांच्या परंपरेनुसार सण आणि उत्सव साजरे केले जातात. भारताच्या संसकृतीचा मोठेपणा त्याच्या सणामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्य सरकारने देखील मुस्लिम समाजाच्या बकरी ईद निमित्त सुट्टी देखील जाहीर केली आहे. असं असताना देखील बुधवारी मुबई येथे चक्क बकरा सोसायटीत आणला म्हणून आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. खरंतर रहिवाश्यानी कायदेशीर मार्गाचा तसेच पोलीस व पालिकेला कळवून कारवाई करायला लावणे आवश्यक होते परंतु तसं न करता याला धार्मिक रंग देण्यात आला? अलीकडच्या काळात हिंदू मुस्लिम सामाजिक सलोख्याला सुरुंग लावण्याचे काम काही समाजविघातक मंडळी करताना दिसत आहे? समाजविघातक मंडळींच्या अश्या जातीय करावयाला सुशिक्षित देखील बळी पडत असल्याचे या घट्नेनिमित्त दिसून येत आहे? मात्र अश्या घटना होण्यामागे आहे तरी कोण? खरंतर याचाच तपास करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा जपणारा साधू संत फकीर महंतांचा राज्य मानला जातो मात्र मुबई येथे घडलेली घटना हि कितपत योग्य आहे ? याबाबत विश्लेषण करण्याची गरज आहे.
मुबई सारख्या शहरात एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये बकरा कुरबानी करणे हे सोसायटीच्या कायद्याप्रमाणे नसेलहि परंतु बकरा कुरबानी होण्याआधीच हे आंदोलन करण्यात आले. मी सोसायटीच्या घरात बकरा आणला कारण बाहेर पाऊस चालू होता गेल्या बारा तासापासून बकरे हे पाण्यात भिजत होते म्हणून मी सोसायटीच्या घरात बकरे आणले. खरंतर आमही बकऱ्याची कुरबानी हि कत्तलखान्यात करतो घरी करत नाही मात्र तरी देखील हे आंदोलन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया मोहसीन खान यांनी दिली आहे. खरंतर बकऱ्याचा भांडवल न करता सोसायटीच्या सदस्यांनी मोहसिनला समजावून सांगितले असते तरीही हि समस्यां सोडवली जाऊ शकत होती. किंवा कायदेशीर मार्गाचा तसेच पोलीस व पालिकेला कळवून कारवाई करायला लावणे आवश्यक होते मात्र आंदोलनकर्त्यांनी देखील सामंजस्यांची भूमिका न घेता आंदोलन केले? त्यामुळे बकऱ्याला विरोध करून मानसिकतेचे प्रदर्शन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहसीनच्या बकऱ्याना देखील सोसायटीतून बाहेर काढण्यात आले आहे