अजित पवार म्हणाले – नशिब मनावर मोठा दगड ठेवला नाही, अन्यथा जीवच गेला असता
नशिब मनावर भला मोठा दगड ठेवला नाही. अन्यथा जीवच गेला असता, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाजपला लगावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरुन आज पत्रकार परिषदेत अजित पवारांनी भाजपला चांगलेच चिमटे घेतले.
अजित पवार म्हणाले, भाजपने धोंडा छातीवर ठेवला की आणखी कुठे हे कुणाला माहित. पण, नशिब त्यांनी भला मोठा दगड ठेवला नाही. पक्षाला झेपेल असाच दगड ठेवला. अन्यथा त्यांचा जीवच गेला असता.
दगडाबाबत सभागृहात सांगेल
चंद्रकांत पाटील यांच्या वक्त्यावर अधिक बोलण्यास अजित पवारांनी नकार दिला. पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणार नाही. त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. थोडे दिवस जाऊ द्या. सभागृहात सांगतो भाजपने कुठे दगड ठेवला अन् कुठे धोंडा ठेवला ते.
अजून भूक गेली नाही का?
राज्यात आणखी एक राजकीय भूंकप होणार असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदारही फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर अजित पवार म्हणाले, आमच्यामध्ये काहीही भूकंप होणार नाही. भूकंप भूकंप करणाऱ्यांनी आता राज्यात ताब्यात घेतल आहे ना. आता किमान ते आधी व्यवस्थित चालून दाखवा. नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यावर प्राधान्य द्या. एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन एवढे बहुमत मिळवले आहे. त्याआधारे सरकारमध्येली आला आहात.. तरीही भूक शमली नाही का. तुमची नेमकी भूक आहे, हे तरी कळू द्या. किती
राज्यात दोघांचेच सरकार
सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआने मंजूर केलेल्या अनेक कामांना स्थगिती दिली. त्यावर अजित पवार म्हणाले, ज्या एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारमध्ये आमच्यासोबत काम केले, आता त्यांनीच मागील कामांना ब्रेक लावण्याचाच सपाटा सुरु केला आहे. असे करण्याचे काहीही कारण नव्हते. ही सर्व विकासाची कामे होते. सरकार येत असतात, जात असतात. आता तर दोघांचेच सरकार आहे. हे दोघे सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत का. दोघेही जाणारच सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत का. दोघेही जाणारच
आहेत. त्यामुळे त्यांनी विचार करायला हवा.