अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचे निवडणुका पार पडले यामध्ये अहमदनगर दक्षिणेत आघाडीने ७ पैकी ४ जागांवर यश मिळवत भाजपाला आसमान दाखवलं आहे. वास्तविक पाहता अहमदनगर दक्षिणेत बाजार समित्यांच्या निकालामुळे भल्याभल्यांना आमदार खासदारकीचे परिणाम दिसले असल्याचे विश्लेषण सध्या शहरात होत आहे तर बाजार समित्यामधली पारनेरच्या निकालावरून स्वतः खासदार सुजय विखेंनी विरोधकांच्या एकत्र येण्यावरून आपला संघटन मजबूत करण्यासाठी मदत होणार असल्याचे देखील वक्तव्य केले आहे. त्यामुळे बाजार समित्याच्या निकालाने भाजपाला मंथन करण्याची वेळ आली आहे.
वास्तविक पाहता काही महिन्यावर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी एक ना अनेक नेते करत आहे. आघाडीचे आमदार निलेश लंके हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे भाजपमधूनच भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी देखील शड्डू ठोकत लोकसभेच्या निवडणुकीच्या रीगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिणेत आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता आमदार खासदारकीचे वेध लागलेल्यांना बाजार समितीवरून चांगलेच परिणाम दिसले असतील असे विश्लेषण केले जात आहे…
खरतर विकासाच्या मुद्द्यावर काम करणारे भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी बाजार समित्यांमध्ये आपली यंत्रणा कामाला लावली असताना देखील त्यांना विरोधकांनी एकत्र येत आसमान दाखविण्याचे काम केले यामध्ये विशेष म्हणजे भाजपामध्येच होणारे गटतट देखील जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पारनेर मध्ये आजी माजी एकत्र आले असतांना देखील भाजपामध्ये मात्र गटातटाच राजकारण करण्यात आले त्याचप्रमाणे राहुरी मध्ये देखील गटतट पाहिला मिळाले आहे त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपाला खऱ्या पद्ध्तीने मंथन करण्याची गरज असल्याची चर्चा होत आहे. तर आमदार खासदारकीचे वेध लागलेल्यांना बाजार समित्यां निवडणुकीच्या निकालावरून परिणाम देखील दिसले असून याचे खरे परिणाम मात्र येणाऱ्याला निवडणुकीत दिसले एवढेच…!