अहमदनगर – राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते पदी असलेले अजित पवारांनी पक्षाशी बंड करत भाजपाला पाठींबा दिला आहे त्यांच्या या बंडात राष्ट्रवादी पक्षाचे २६ आमदार सोबत असल्याने अजितदादांच्या गळ्यात भाजपाने चक्क उपमुख्यमंत्र्याची माळच गळ्यात घातली आहे. भाजापाकडे बहुमतांचा आकडा असतांना देखील भविष्यात भाजपाला धोका होऊन नये म्हणून दादांनि आपल्या सोबत आपल्या २६ सहकाऱ्यांना देखील नेले आहे. वास्तविक पाहता राष्ट्रवादी पक्षाच्या एकूण आमदारांचा आकडा ५२ असतांना अजित पवारांनी २६ आमदार आपल्यासोबत नेले असून त्यापैकी अजित पवारांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांची यादी खालील प्रमाणे तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची यादी देखील खालील प्रमाणे
अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार…
अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), धर्मराव बाबा आत्राम (अहेरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), दत्तात्रय भरणे (इंदापूर), दौलत दरोडा (शहा शेखर निकम (चिपळूण), सरोज अहिरे (देवळाली), किरण लहाने (अकोले), अशोक पवार (शिरूर), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), निलेश लंके (पारनेर), सुनील भुसारा (विक्रमगड), अतुल बेनके (जुन्नर), संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील शेळके (मावळ), अण्णा बनसोडे (पिंपरी), दिलीप मोहिते (खेड आळंदी)
तसेच शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार…
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), राजेश टोपे (घनसावंगी), अनिल देशमुख (काटोल), जयंत पाटील (इस्लामपूर), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), शामराव पाटील (कराड उत्तर), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), नवाब मलिक (अणुशक्ती नगर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तु मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दीपक चव्हाण (फलटण), अशोक पवार (शिरूर), मकरंद जाधव (वाई), चंद्रकांत नवघरे (बसमत), इंद्रनील नाईक (पुसद), मानसिंग नाईक (शिराळा), नितीन पवार (कळवण), रोहित पवार (कर्जत जामखेड), राजेश पाटील (चंदगड), सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ), दिलीपराव बनकर (निफाड), यशवंत माने (मोहोळ), बबनराव शिंदे (माढा) संदीप क्षीरसागर (बीड)
दरम्यान ही यादी समोर आली असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन ते तीन दिवसात याबाबत सांगणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी आमच्याकडे सर्व आमदार असून तुम्ही काही काळजी करू नका, असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात संख्याबळ कोणासोबत जास्त आहे हे समोर येईल.