अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यासह शहरात पोलिसांचा धाक म्हणा किंवा दरारा संपला आहे ? अशी काहीशी परिस्थिती सध्या अहमदनगरकर अनुभवताहेत शहराच्या उपनगरमध्ये नागरिकांची ये जा असलेल्या वर्दळीच्या एकविरा चौकात रात्री १० च्या सुमारास काळ्या रंगाच्या चारचाकी गाड्यातून आलेल्या गुंडांनी सामाजिक कार्यकर्ते अंकुश चत्तर याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात रॉड घातले. लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यानीं बेदम मारहाण करण्यात आलेलया अंकुशची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र अश्या बिनधास्तपणे वर्दळीच्या ठिकाणी हातात शस्त्र घेऊन हल्ला चढविणे म्हणजे शहरात पोलिसांचा धाक संपला आहे कि काय हाच प्रश्न या निमित्ताने सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
खरंतर गेल्याकाही दिवसांत अहमदनगर शहरासह जिल्ह्यात खून दरोडे मारामाऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही दिवसापूर्वी अहमदनगरच्या रस्त्यावर हातात नंग्या तलवारी घेऊन ओंकार भागानगरे या युवकाची वार करून हत्या करण्यात आली होती. तर पाईपलाईन परिसरात धारधार शस्त्राने एका युवकावर वार करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कापड बाजारात देखील व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. तर शहरात जाती धर्माच्या नावावर अनेक ठिकाणी दगडफेक व दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याच जातीधर्माच्या आधारे करण्यात येणाऱ्या वाद विवादात अकोल्याच्या एका नाहक युवकाचा जीव गेला होता एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील अहमदनगर शहर, संगमनेर, पारनेर, अकोले,श्रीरामपूर, कोपरगाव या सह एक ना अनेक तालुक्यात रक्तरंजित हल्ले होत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मवाळ भूमिकेविरुद्ध आता नगरकरांमध्ये पोलिसांप्रती प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे
अहमदनगर शहराच्या रस्त्यांवर रात्रीच्या काळोख्या अंधाराचा फायदा घेत शहरातील गुंड धारधार शस्त्राने हल्ले करत आहे. त्या हल्ल्यात रस्त्यावर पडणाऱ्या रक्ताचे शिंतोडे पोलिसांच्या खाकीवर देखील डाग लावण्याचे काम करत आहे?. परंतु जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहरासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व दहशद माजविणाऱ्यांच्या मनात धाक निर्माण करण्याऐवजी रस्त्यावर वाहन तपासणी करण्यात व्यस्त आहे हे विशेष… खरंतर ओंकार भागानगरे याची हत्या देखील रात्रीच्या काळोख्या अंधारात धारधार शस्त्राने भर रस्त्यावर करण्यात आली होती तर अंकुश चत्तरवर देखील करण्यात आलेला हल्ला भर चौकात करण्यात आला आहे. दरम्यान शहरात घडणाऱ्या घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पंचनामा करून आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना करत आहे त्यापलीकडे गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर शहरात होणाऱ्या जातीयवादी व हत्याच्या घटनेबाबत पोलीस अधीक्षक काही ठोस भूमिका घेताना दिसत नाही?. आज शहरात राजरोसपणे हत्या, अत्याचाराच्या घटना , दरोडे सारख्या घटना घडत आहे एवढेच नव्हे तर अवैध धंदे देखील तितकेच फोफावले असतांना देखील त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे अहमदनगर शहराच्या रस्त्यावर पडलेल्या रक्ताचे शिंतोडे खाकिला देखील डाग लावण्याचा काम करत आहे?. पोलिसांविषयी नागरिकांच्या मनात असलेला विश्वास देखील दिवसेंदिवस संपत चालला असल्याने येणाऱ्या काळात तरी जिल्हा पोलीस अधीक्षक गुन्हेगारी व गुन्हेगारांवर खाकीचा दरारा निर्माण करण्यासाठी ठोस पाऊले उचलतील हिच अपेक्षा अहमदनगरकर व्यक्त करत आहे…