अहमदनगर – अहमदनगर शहरातील केडगाव येथे विधीतज्ञ हर्षद चावला यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. चावला यांनी शहरातील अवैधधंद्या संदर्भात तक्रार केल्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. चावला यांनी सांगितल्या प्रमाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याशी व विधीतज्ञ् चावला यांचा आणि माझा कुठलाही संबंध किंवा परिचय नसल्याचा धक्कादायक खुलासाच किरण काळे यांनी केला आहे. त्यामुळे चावला यांच्यावर झालेला हल्ला हा बनाव तर नाही ना हाच प्रश्न आता सर्वसामान्य नगरकरांना पडला आहे.
विधीतज्ञ् हर्षद चावला यांच्यावर हल्ला झाल्यानंतर किरण काळे यांनी या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. खरंतर पोलिसांनी या हल्ल्याबाबत तपास करत असतांना प्रत्येकाचे CDR तपासण्याची मागणी काळे यांनी केल्याने शहरात खोटे गुन्हे दाखल करून संबंधितांना अडकविण्याचे षडयंत्र तर रचले जात नाही ना…? हाच मुद्दा आता उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अहमदनगर शहरात आधी ब्लॅकमेल करायचे आणि पैशे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करायचे असा फंडाच अनेक जण करत असल्याने ? विधीतज्ञ यांच्यावर झालेला हल्ला, त्यांनी केलेलं आरोप व त्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देत सखोल चौकशी करण्याची काळे यांच्याकडूनच होणारी मागणी हि खरोखरच सामान्य माणसाला विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत सखोल तापास करावा अशी मागणी देखील आता नगरकरांमधून होत आहे.
दरम्यान हर्षद चावला यांच्यावर झालेला हल्ला हा केडगाव पंपिंग स्टेशन जवळ झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे खरंतर केडगाव मध्ये पंपिंगस्टेशन आहे का ? असेल तर त्या परिसरातील CCTV देखील तपासण्याची गरज आहे. आज अहमदनगर शहरासह जिल्ह्या मध्ये अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आहे मात्र एखाद्या विधीतज्ञांवर जीवघेणा हल्ला होणे हे खेदजनक बाब आहे त्यामुळे किरण काळे यांच्या मागणीनुसार पोलिसांनी सखोल तपास करण्याची गरज आहे. खरंतर खोटे गुन्हे दाखल झाल्यनंतर पोलीस संबंधित आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करते खरे मात्र पोलिसांनी अटक केल्यानंतर जर तो गुन्हा सिद्ध न झाल्यास खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर पाहिजे तशी कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे विधीतज्ञ् हर्षद चावला यांनी हल्ला करणाऱ्यांचे जरी नावे उघडपणे सांगितली असली तरी दुसरीकडून मात्र किरण काळे यांनी चावला यांचे सर्व आरोप फेटाळून लावत सखोल तपास करण्याची मागणी केल्याने खरोखरच अहमदनगर शहरात हल्ल्याचा बनाव करून खोटे गुन्हे रचण्याचे षड्यंत्र तर होत नाही ना ? हाच प्रश्न आता सर्व सामान्य नगरकरांना पडला आहे…..