अहमदनगर – अहमदनगर शहरातील मुकुंदनगर या उपनगरांमध्ये म्हैसावाला गैंगचा उच्छाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. एका मध्यमवर्गीय मौलानांवर हल्ला चढवत मारहाण करण्यात आली आहे या संदर्भात भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात म्हैसावाला गैंगच्या मोहरक्याचा पंटर म्हणून काम पाहणाऱ्या अनिस सय्यद वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदनगर परिसरातील हुसेनमियां मस्जिद येथे मौलाना म्हणून कार्यरत असलेले मौलाना अस्लम शेख यांनी काही दिवसापूर्वी गैस कनेक्शन घेण्यासाठी जुबेर आणि अनिस यांच्याकडे पैसे दिले होते त्यानुसार जुबेर याने गैसचे कार्ड हे मौलाना यांना आणून देत कार्ड वरील असलेले टाक्या आणि रेग्युलेटर हे संबंधित गैस एजन्सी कार्यालयात जाऊन घेऊन या असे सांगितले. मौलाना यांनी संबंधित गैस एजन्सी मध्ये टाक्या घेण्यासाठी गेले असता तुमच्या टाक्या आणि रेग्युलेटर कार्यालयातून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मौलाना हे टाक्या आणि रेग्युलेटर घेण्यासाठी संबंधित गैस एजन्सी कार्यालयात गेल्याची माहिती अनिस सय्यद याला मिळताच म्हैसावाला गैंगचा सदस्य असलेल्या अनिस सय्यद याने मौलाना अस्लम शेख यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात मौलाना अस्लम शेख यांच्या फिर्यादीवरून भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पूर्वी देखील म्हैसावाला गैंगने मुकुंदनगर या भागात दहशद माजवित घरावर दगडफेक केली होती. त्यावेळी देखील म्हैसावाला गैंगच्या सदस्यांवर भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र भिंगार कँम्प पोलिसांकडून आरोपींवर पाहिजे तशी कारवाई झाली नाही आणि त्यामुळे भिंगार पोलिसांचा धाक अश्या गुंडांवर राहिला नसल्याचे चित्र आज घडलेल्या एका धर्मगुरूवर घडताना पाहायला मिळाला आहे. खरंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ”टू प्लस” योजना अहमदनगर शहरासह जिल्ह्यात राबवत एक ना अनेक ”भाई” नां आस्मान दाखवत मोक्का सारखी कारवाई केली होती. आता मात्र अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या कार्यवाहीचा प्रभाव गुंडगिरी आणि दहशद माजविणाऱ्या गुंडांवर पडतांना फारसा दिसत नाही आणि म्हणूनच अश्या गुंडांची दहशद अहमदनगर शहरात राजरोजपणे वाढतांना दिसत आहे.
अहमदनगर शहरातील मुकुंदनगर या उपनगरात एक ना अनेक भाई आले मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच अनेक भाईच्या बुडाखाली आग लागल्याचे चित्र मुकुंदनगरकरांनी पाहिले आहे. आता मात्र पोलिसांची आबरू बंद पाकिटात ठेवल्यासारखे नव्याने उदयास आलेली म्हैसावाली गैंग मुकुंदनगर मध्ये वावरत असून अश्या गैंगवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.. विशेष म्हणजे म्हैसावाला गैंगचा मोहरक्यावर याआधी देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. एवढेच नव्हे तर म्हैसावाला गैंगच्या सदस्यांवर देखील ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल असतांना पोलीस अश्या गुंडांना पाठीशी तर घालत नाही ना ? हाच प्रश्न या मारहाणीच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे…