अहमदनगर – अहमदनगर शहरातील मुकुंदनगर या उपनगरांमध्ये म्हैसावाला गैंगचा हैदोस थांबता थांबेना पोलिसांच्या नाकावर टिचून म्हैसावाला गैंग सर्वसामान्यांवर दहशद माजवीत असताना दुसरीकडे मात्र पोलीस प्रशासन डोळ्यावर पडदा पडल्यासारखी कार्यवाही करतांना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी म्हैसावाला गैंगचा सदस्य असलेला अनिस सय्यद याने मुस्लिम धर्मगुरूना भर चौकात मारहाण केली होती या संदर्भात भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन एक दिवस उलटत नाही तर याच म्हैसावाला गैंगच्या अनिस सय्यद नामक सदस्यांने आणखीन एक धर्मगुरूं असलेले मौलाना हमीद शेख यांच्या घरावरच ताबा मारल्याची घटना मुकुंदनगरमध्ये घडली आहे. वास्तविक पाहता मुकुंदनगर मध्ये नव्याने उदयास आलेल्या म्हैसावाला गैंगला पोलिसांचा धाक राहिला नसल्याने या गैंगचा हैदोस थांबता थांबेना त्यामुळे आता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला या म्हैसावाला गैंगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का ? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
मुकुंदनगर या उपपनगरामध्ये म्हैसावाला गैंगची दहशद हि सर्वसामान्यांना आपलं घर सोडण्यास भाग पाडत आहे. घरावर ताबा मारणे, सामान्य नागरिकांकडून हप्ते गोळा करणे, दहशद माजविने अशे प्रकार या म्हैसावाला गैंगकडून वारंवार होत आहे. वास्तविक पाहता हि गैगं संघटित गुन्हेगारी करत आहे. १० ते १२ जणांच्या टोळक्याने दुचाकी गाड्यावर रात्रीच्या वेळी शक्ती प्रदर्शन करत दहशद माजवायची हे या गैंगच ठरलेलच. पोलीस हि कारवाई करत नसल्याने चक्क पोलीस अधिकाऱ्यांनाच बंद पाकिटात ठेवल्यासारखे हि गैंग मुकुंदनगर मध्ये वावरत आहे. एवढेच नव्हे तर पोलीस आमचे काहीही वाकडे करू शकत नाही अश्या धमक्याच उघडपणे देण्यात येते त्यामुळे येथील नागरिक या म्हैसावाला गैंगमुळे दहशदी खाली जगत आहे. सामान्य नागरिकांसह आता यांची मजल धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मगुरूवरच हल्ला चढविण्या पर्यत गेली आहे. एवढेच नव्हे तर या म्हैसावाला गैंगच्या अनिस सय्यद या झोपडपट्टी गुंडाने तर चक्क धर्मगुरू मौलाना हमीद शेख यांच्या घरावरच ताबा मारल्याने मुकुंदनगरच्या नावावर कालिक पोतनाऱ्या या गुंडांवर संघटित गुन्हेगारी तसेच झोपडंपट्टी गुंडा एक्ट नुसार मोक्का अंतर्गत तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खरंतर मुकुंदनगर या उपनगरांचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कौतूक केले होते कारण मुकुंदनगर या उपनगरांमध्ये एकही अवैध धंदा, वैश्या व्यवसाय, दारू धंदा अश्या कोणत्याही प्रकाराचे धंदे चालत नाही व येथील नागरिक अश्या अवैध कामांना थारा देखील देत नाही. असं असल तरी मुकुंदनगरकर म्हैसावाला गैंगच्या गुंडगिरीला का सहन करत आहे ? हे समजेनासे झाले आहे. वास्तविक मध्ये मुकुंदनगरकरांना अश्या गुंडागिरीच्या विरोधात एकजूटता दाखविण्याचा खरी गरज आहे…. अस्लम शेख या धर्मगुरूवर म्हैसावाला गैंगच्या अनिसने हल्ला केल्यानंतर न्यूज अलर्टनेबातमी प्रसारित करताच मुकुंदनगर येथील मुस्लिम धर्मगुरू मध्ये एक धाडस तयार झाले आणि सर्व धर्मगुरूंनी एकजूट होत अश्या झोपडंपट्टी गुंडांवर कारवाईची मागणी करत आवाज काढला. खरंतर मुकुंदनगर या उपनगरांमध्ये म्हैसावाला गैंगची वाढलेली दहशतीला न जुमानता ज्या नागरिकांवर अन्याय झाला आहे त्यांनी खरंतर पुढे येण्याची हीच वेळ आहे. त्यांच्यावरझालेल्या अन्यायासंदर्भात वाचा फोडण्याची धमक आमच्यात असल्याने अश्या झोपडपट्टी गुंडांना आम्ही भीक घालत नाही. त्यामुळे अन्यायबाबत पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यास त्याना देखील जागे करण्याचे काम आम्ही करतो आणि करणारच हे मात्र नक्की त्यामुळे आता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील आपल्या खाकीची धमक दाखवत मुकुंदनगर मध्ये हैदोस घालणाऱ्या या म्हैसावाला गैंगचा बंदोबस्त करावा हीच मागणी सर्वसामान्य मुकुंदनगरकर व धर्मगुरू करत आहे…