अहमदनगर – अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसापूर्वी ऍडव्होकेट हर्षद चावलावर केडगाव परिसरात हल्ला करण्यात आला होता या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चावलावर झालेला हल्ला हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या सांगण्यावरून पवार, कचरे, आणि शेख या तिघांनी केला असल्याची माहिती फिर्यादीत दाखल करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार आणि कचरे यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली होती त्यावेळी एडव्होकेट चावला यांची पैशे देण्याघेण्या संदर्भात असलेली कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली होती. दरम्यान एडव्होकेट चावला यांच्या कॉल रेकॉर्डिंग नंतर आता काँग्रेस पक्षाचे जिहअध्यक्ष किरण काळे यांनी थेट CCTV समोर आणून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीवर आरोप केले असून एडव्होकेट चावलावर हल्ला झालाच नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
ऍडव्होकेट चावला याच्यवर हल्ला झाला नसल्याचा आरोप करण्यात आला असला तरी व्हायरल झालेली रेकॉर्डिंग आणि समोर आलेले CCTV यावरून दाखल झालेला गुन्हा देखील खोटा असल्याच निष्प्प्न होत आहे? घडलेल्या घटनेनंतर सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे दाखल गुन्ह्यातील पवार आणि कचरे हे घाणेरड्या राजकारणाचे बळीचे बकरे ठरले असल्याचे बोलले जात आहे. अहमदनगर शहरामध्ये एडव्होकेट चावलावर झालेला हल्ला हा पहिला हल्ला नाही. याआधी देखील एडव्होकेट चावलावर हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत असल्याने चावला यांच्यावर झालेला हल्ला व त्यांनी दाखल केलेला गुन्हा हा खराच खरा आहे का ? याबाबत देखील आता शहरात तर्क वितर्क लावण्यात येत असून पोलिसांनी याबाबत लवकरात लवकर सखोल तपास करण्याची गरज आहे.
अहमदनगर मध्ये २०२३ साली अनेकांवर खोटे गुन्हे देखील दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणात पवार व कचरे यांच्यासारख्या युवकांचा बळी घेतला जात असल्याचे चावला प्रकरणावरून सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपवरून दिसत आहे ?. मात्र सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे व शॉर्टकट पैसा कमविण्याच्या छंदात एखाद्याचा मुडदा शहरात पडल्याशिवाय राहणार नाह हे हि तितकेच खरे. कारण वर्चस्वाच्या लढाईत गेल्या काही दिवसापूर्वी अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात गामा भागानगरे याचा नंग्या तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. गामा भागानगरे याची हत्या देखील वर्चस्वामुळे झाली होती? एवढेच नव्हे तर सावेडी भागात देखील अकुंश चत्तर यांच्या हत्येला देखील वाढत असलेला वर्चस्व असल्याने राजकारण्यांच्या या वर्चस्वाच्या व आरोप प्रत्यारोपाच्या लढाईत तरुण युवकांचे बळी जाऊ नये हीच अपेक्षा….