Ahmednagar | बाबा हाजी यांचा हज यात्रे दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे .अहमदनगर शहरातील प्रसिद्ध हज अँड उम्राटुर्स चे काही हजयात्रे करू घेऊन बाबा हाजी हे हज यात्रे साठी रवाना झाले होते .हज यात्रेला जाण्या आगोदर आपण त्या प्रसिद्ध हज अँड उम्राटुर्स चे काही हाजी घेऊन जात असल्याची माहिती बाबा हाजी यांनी आपल्या निकट कर्तीयांना तसेच मित्र परिवाराला दिली होती . मध्यन्तरी सदर हज अँड उम्राटुर्स च्या संचालकाने काही हज यात्रे करुंची फसवणूक केली असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु होती.त्या संदर्भातील बातमी प्रसारित होताच त्या प्रशिध्द हज अँड उम्रा टुर्स च्या संचालकाच्या काही पंटरांनी सदर बातमी त्याच्या पर्यंत पोहचवली आपल्या कारनाम्याची गावभर चर्चा सुरु असल्याचे लक्षात येताच त्या संचालकाने भारतात परतण्या आगोदर मदिना एअरपोर्ट येथून स्वताहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता .
त्या व्हिडिओत आपल्या हज अँड उमरा टूर्स च्या मार्फत हज यात्रा करण्या साठी आलेल्या हज यात्रे करूनच हज पूर्ण झाला असून सर्व जण सुखरूप आहेत आणि आम्ही भारतात परतत आहोत काही वेळातच आमचा विमान हा विमानतळावर येणार असल्याच त्या संचालकाने व्हिडिओत सांगितलं होत . त्याच बरोबर काही हज यात्रे करुंचा व्हिडिओ सुद्धा दाखवला होता . भारतात परतल्या नंतर काही स्थानिक लोकल Tou Tube चॅनल वर त्या संचालकाने स्वताची मुलाकात सुद्धा प्रसारित करून घेतली . मात्र ती मुलाकात देताना त्याने बाबा हाजी संदर्भात कुठलाच खुलासा केला नव्हता . सर्व हज यात्रे करू परतल्या नंतर बाबा हाजी हे आलेच नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांच्या लक्षात येताच बाबा हाजी यांच्या नातेवाइकांनी त्या हज अँड उम्राटुर्स च्या संचालकांशी संपर्क साधला मात्र त्या संचालकाने उडवा उडवीचे उत्तर दिले .
त्या नंतर बाबा हाजी यांचे काही नातेवाईक बुधवार दिनांक २४ जुलै रोजी दुपारी त्या हज अँड उम्राटुर्स च्या संचालकाला समक्ष भेटण्यासाठी त्याच्या ऑफिस वर गेले होते . त्या वेळेस बाबा हाजी यांच्या नातेवाइकांन समोर त्या संचालकाने बाबा हाजी यांच्या मृत्यूचा दाखला ठेवला बाबा हाजी यांचा एक महिन्या पूर्वी मृत्यू झाला असून त्या संदर्भात आपल्याला आणखीन काही माहीत नाही . बाबा हाजी व आमच्या हज अँड उम्राटुर्स चा काहीच संबंध नाही असे उत्तर त्या हज अँड उम्राटुर्स च्या संचालकाने बाबा हाजी यांच्या नातेवाइकांना दिले. सदर संचालकाच्या बोलण्यावरण बाब हाजी यांच्या कुटुंबीयांना बाबा हाजी यांच्या मृत्यू बद्दल शंका वाटत आहे
प्रश्न क्र १ नगर शहरातील इतर हज अँड उमरा टूर्स चे ऑफिस सोडून बाबा हाजी यांचे कुटुंबीय त्याच हज अँड उमरा टूर्स च्या संचालका कडे का गेले ?
प्रश्न क्र २ बाबा हाजी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पासपोर्ट वर जो पत्ता दिला आहे त्या पात्यावरच सौदी अरब सरकार ने मृत्यू दाखला का पाठवला नाही ?
प्रश्न क्र ३ बाबा हाजी यांच्या शी काहीच संबंध नाही तर त्या संचालकाकडे बाबा हाजी यांचा मृत्यूदाखला कसा आला .
प्रश्न क्र ४ बाबा हाजी यांचा मृत्यू जर एक महिन्या पूर्वी म्हणजेच १६ – ६ -२०२४ या तारखेला झाला तर इतक्या दीवस ही गोष्ट बाबा हाजी यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात का आली नाही. ?
प्रश्न क्र ५ हज यात्रे दरम्यान अहमदनगर शहरातील अनेक हजयात्रे करू त्या वेळेस त्या ठिकाणी होते ,मात्र बाबा हाजी त्यांच्या मृत्यू बद्दल इतर कोणालाच कसे माहिती नाही ?
प्रश्न क्र ६ हज यात्रे दरम्यान त्या प्रसिद्ध हज अँड उमरा टूर्स ची बॅग बाबा हाजी यांच्या कडे का होती ?
या प्रश्नां सह आता इतर ही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्या मुळे सौदी अरब येथे बाबा हाजी यांच्या सोबत नेमकं काय घडलं त्यांचा मृत्यू कसा झाला या सर्व प्रकाराचा तपास पोलीस यंत्राने मार्फत होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे.