अहमदनगर शहरात काही महिन्यांन पूर्वी बायोडिझेल चा काळा बाजार समाजा समोर आला होता .त्या नंतर आता हिप्पो गॅस चा मोठा काळा बाजार समोर येत आहे. हिप्पो गॅस चा काळा बाजार करून महिन्याला कोट्यवधी रुपये कमवले जात आहेत .
मागील चार पाच दिवसांन पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वारूळ वाडी परिसरात सुरु असलेल्या अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला होता .सदर कारवाईत पोलीसांनी विविध गॅस कंपनीच्या २०० हुन अधिक घरगुती व व्यवसायिक टाक्या जप्त केल्या होत्या.हा सर्व प्रकार सैन्य दलाच्या संरक्षण भिंतीच्या काही अंतरावरच सुरु होता हे विशेष . सदर बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई करत असताना पोलिसांच्या निदर्शनास मात्र सर्वात म्हत्वाची गोष्ट आलीच नाही आणि ती म्हणजे याच ठिकाणी असलेले भले मोठे हिप्पो गॅस सिलेंडर . हिप्पो गॅस सिलेंडर चा वापर हा मोठ मोठ्या कंपन्यां न मध्ये बॉयलर साठी केला जातो त्याची अधिकृत परवानगी घेतल्या शिवाय तो वापरला जाऊ शकत नाही . असे असताना सुद्धा एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरु असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर हे सिलेंडर आलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे . हिप्पो गॅस सिलेंडर मध्ये जवळपास साडे चारशे ते पाचशे किलो इतके गॅस असते आणि त्याची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांन पर्यंत असते . चुकून सुद्धा त्यातील एका सिलेंडरचा स्फोट झाला तर कमीत कमी ३ किलोमीटर पर्यंतचा परिसर त्यात उध्वस्त होऊ शकतो . या पूर्वी देखील अनाधिकृत पने गॅस रिफिलिंग करताना गॅस टाक्यांचा स्फोट होऊन दुर्घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत .असे असताना थेट सैन्य दलाच्या संरक्षण भिंतीच्या काही अंतरावरच अनाधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर चालवले जात होते . कारवाई करण्यात आलेल्या वारूळवाडी येथील अनाधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर वर इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती ,व्यवसायिक तसेच कंपनीत वापरले जाणारे भले मोठे हिप्पो गॅस सिलेंडर आलेच कसे याचा पोलीसांनी कसून तपास करण्याची गरज आहे.
असा केला जातो हिप्पो गॅस सिलेंडर चा वापर : हिप्पो गॅस सिलेंडर मध्ये जवळपास साडे चारशे ते पाचशे किलो इतके गॅस असते आणि त्याची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांन पर्यंत असते . चुकून सुद्धा त्यातील एका सिलेंडरचा स्फोट झाला तर कमीत कमी ३ किलोमीटर पर्यंतचा परिसर त्यात उध्वस्त होऊ शकतो . असे असताना ही इतरांच्या जिवाची कुठली ही परवा न करता आरोपी हिप्पो गॅस सिलेंडरचा वापर बिनधास्त करत आहेत . हिप्पो गॅस सिलेंड मधील गॅस काढून तो गॅस व्यवसायिक सिलेंडर मध्ये भरला जात आहे. १९ केलो क्षमतेच्या एका व्यवसायिक गॅस सिलेंडर मध्ये १४ केलो गॅस आणि २ लिटर चक्क पाणी भरून तो १७०० रुपयात हॉटेल व्यवसायीकांना विकला जात आहे . एका गॅस सिलेंड मागे ५०० रुपयांन पर्यंतची कमाई केली जात असून दररोज एका एका अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवरन १००० ते १५०० घरगुती व व्यवसायिक गॅस टाक्यांचा काळा बाजार केला जात आहे . वारूळवाडी येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर बेकायदेशीर पने गॅस टाक्या पुरवण्यात पाइपलाईन येथील युनिटेक गॅस एजन्सी मधील काही कर्मचऱ्यांचा सुद्धा सहभाग असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांन कडन प्राप्त झाली आहे .
पुरवठा विभागाचा निष्काळजी पणा : शहरात सुरु असलेल्या अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर घरगुती वापराच्या व्यवसायिक वापराच्या तसेच मोठमोठ्या कंपनीत वारले जाणारे गॅस सिलेंडर येतातच कसे असा प्रश उपस्थित होत आहे . पुरवठा विभाग या सर्व प्रकारा कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे . कारण गॅस सिलेंडर च्या वितरणावर किंवा होत असलेला काळा बाजार थांबवण्याची जबाबदारी ही पुरवठा विभागाची आहे . मात्र अहमदनगर शहरातील पुरवठा विभाग हे पूर्णपणे निष्काळजी असल्याचे दिसून येत आहे .