Ahmednagar | मुकुंद नगर मधील लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या मुजोर अल्ताफ सैयद याचे सर्व अतिक्रमण पाडण्यात यावे अशी मागणी मृत मुलाच्या वडिलांनी महानगर पालिका प्राशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे .
मुकुंदनगर परिसरातील शहाजी नगर भागात ४ ऑगस्ट रोजी हौदात पडून समर शेख या तीन वर्षीय लहान मुलाचा दुरदैवी मृत्यू झाला . या घटनेला सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद हाच जवाबदार असल्याचा आरोप समर शेख याच्या कुटुंबीयांनी केला आहे..सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद याने परिसरात बेकायदेशीर बांदकाम केले असून नागरिकांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर लोखंडी जिना बांध लेला आहे तसेच त्या ठिकाणी पाण्याचा हौद सुद्धा त्याने बांधलेला आहे .सदर अतिक्रमणा संदर्भात मागील वर्षी म्हणजेच ९ ऑक्टॉबर रोजी परिसरातील नागरिकांनी महानगर पालिकेकडे तक्रार अर्ज सादर केले होते . मात्र महानगर पालिकेकडून सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद याने केलेल्या अतिक्रमणावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही .
ज्या हौदात पडून तीन वर्षीय समर शेख याचा मृत्यू झाला त्याच हौदात या पूर्वी सुद्धा अनेक मुकी जनावर पडून मृत्यू पावले होते . सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद याला या संदर्भात अनेक वेळा परिसरातील नागरिकांनी सावध सुद्धा केले होते . रस्त्यावरच अतिक्रमण करून बांधलेल्या हौदा मुळे मोठी दुर्घटना घडू शकते असे वारंवार सांगण्यात आले होते . मात्र सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद हा नेहमीच परिसरातील नागरिकांशी मुजोरी करत होता . कुणी मेल तर माझ्या कडे या अशा मुजोरीत तो नागरिकांना उत्तर देत होता . शेवटी तेच झाले सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद याच्या मुजोरी मुळे आज एका निष्पाप बालकाचा जीव त्याच हौदात गेला.
महानगर पालिका प्रशासनाने आतातरी गांभीर्य दाखवून सादात किराणा स्टोअर्स चा मालक अल्ताफ सैयद याने केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी समर शेख याच्या कुटुंबीयांनी केली आहे .
अल्ताफ सैयद