Ahmednagar | अहमदनगर शहरातील चांदसुल्ताना स्कूल अँड हायस्कुल संचालित ATU जदीद उर्दू प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्यध्यापक नासीर ख्वाजालाल सैयद यांच्या सह दानिश जब्बार शेख व इम्रान अय्युब खान या शिक्षकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यध्यापक नासीर ख्वाजालाल सैयद यांनी त्यांच्या शाळेतील दानिश जब्बार शेख व इम्रान अय्युब खान या दोन शिक्षकाच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव २०२० मध्ये जिल्हा परिषदेला सादर केला होता . या प्रस्तावा सोबत जोडलेले TET प्रमाणपत्र बनावट असल्याचे पुणे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते . या दोन्हीही शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाने दिलेले होते . असे असतानाही अहमदनगर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी गुलाब सैयद यांनी सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली होती . या शिक्षकांची शालार्थ प्रणाली मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी प्रस्ताव पुणे येथील उपसंचालक विभागा कडे गेला .त्या वेळी झालेल्या सुनावणी दरम्यान शिक्षकांना मान्यता देताना त्यांची आवक जावक रजिस्टर मध्ये नोंद नसल्याचे आढळून आले. तसेच TET प्रमाणपत्र सुद्धा बनावट असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी दोघा शिक्षकानं विरोधात पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . त्या नंतर शिक्षक व मुख्यध्यपकांनी शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्याना हाताशी धरून कार्यालयातील फाईल मधील बनावट TET चे प्रमाणपत्र काढून घेऊन त्याच्या जागी CET चे प्रमाणपत्र ठेवले होते . ही बाब पुणे येथील सायबर पोलिसांच्या निदर्शनास आली . त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले जिल्हा परिषदेला दिले होते . त्या नुसार उप मुख्य कार्यकारी अधिकऱ्यान मार्फत चौकशी करण्यात आली . या चौकशीत रजिस्टर मध्ये नोंद न करता तत्कालीन शिक्षण अधिकाऱयांनी दोन शिक्षकांना मान्यता दिल्याचे समोर आले.
त्या नुसार उपशिक्षण अधिकारी राजश्री मधुकर घोडके यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी गुलाब सैयद ,कनिष्ठ सहाय्यक सी. ए. धनवळे . चांदसुल्ताना स्कूल अँड हायस्कुल संचालित ATU जदीद उर्दू प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्यध्यापक नासीर ख्वाजालाल सैयद यांच्या सह दानिश जब्बार शेख व इम्रान अय्युब खान या शिक्षकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .