Ahmednagar | दोन दिवसां पूर्वी धार्मिक उस्तवाच्या कार्यक्रमात नगर शहरातील एका चौकात धार्मिक भावना दुखावणारे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते…सदर फ्लेक्स बोर्ड एका समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याच्या उद्देशाने लावण्यात आले होते. त्या फ्लेक्स बोर्ड चे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले….विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या बोर्डवर नगर शहरातील कार्यसम्राट असलेल्या लोकप्रतिनिधीचे सुद्धा फोटो पाहायला मिळाले….सदर च्या प्रकारामुळे त्या लोकप्रतिनिधी बद्दल आता समाजात तीव्र संतापाची लाट उमटली आहे…सोशल मीडियावर लोक आपल्या भावना व संताप व्यक्त करताना दिसत आहेत…
दोन्ही समाजाला एकत्र घेऊन शहराचा विकास करण्याच्या फक्त गप्पा मारणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीचा खरा चेहरा आता समाजा समोर आला आहे… शहराच्या विकासा सोबतच दोन समाजात सलोखा राखण्याचे काम हे लोकप्रतिनिधीचे असते. आपसातील मतभेद मिटवून शहरातील लोक गुण्यागोवींदाने कसे राहतील या साठी लोकप्रतिनिधीने काम करणे गरजेचे आहे. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी हे स्वताहाच्या स्वार्था पोटी वाट्टेल त्या स्तरावर जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे . कारण चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची हिंमत आता या लोकप्रतिनिधी मध्ये राहिली नसल्याचं बोललं जात आहे .
मागील महिन्यात समाजातील काही मूठभर लोकांना सीडी वाजवण्या साठी वर्गणी दिली म्हणजे या लोकप्रतिनिधीने पूर्ण समाजच विकत घेतला की काय असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे .ऐन निवडणुकीच्या तोंडावर गल्ली बोळीत कॉंक्रेटी कारणाचे काम केले म्हणजे समाजावर मोठे उपकार केले बहुतेक याच भ्रमात कार्यसम्राट असल्या सारखं वाटत आहे. अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट होत आहे…
ज्या घटना शहरात घडल्या नाहीत किंवा ज्या घटनांशी येथील समाजाचा संबंध नाही अशा घटनांचा जाणीव पूर्वक प्रचार करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे . या गोष्टी थांबवण्या ऐवजी त्याला आणखीन पाठबळ देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करताना दिसत आहे . या सर्व प्रकारा मुळे त्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच गोची झाल्याची दिसून येत आहे . दुटप्पी भूमिकेमुळे दिवसभर कार्यसम्राटच समाजात कौतुक करत फीरणाऱ्यांचे ही सध्या तोंड बंद आहेत….
याच जाती वादी भूमिके मुळेच विखे यांना हार पथकारावी लागली…माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या एका विधानाने एक समाज विखे यांच्या पासून दूर गेला आणी त्याचा परिणाम निवडणुकीत पाहण्यास नगरकरांना मिळाला…सध्या अशीच परिस्तिथी “त्या ‘ जाती वादी फ्लेक्स मुळे होताना दिसत आहे…ही परस्तिती कार्य सम्राट कसे हाताळतात हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे….