Ahmednagar : नगर शहरातील अनेक भाईजान सध्या टेंशन मधे…दोन मामूने मिळून लावला कोट्यावधी रुपयांचा चुना…कमीशन पडले महागात …१ लाख रुपयांवर महिन्याला २० हजार रुपयांचा नफा..शॉर्टकट पैसे कमवण्याच्या नादात अहमदनगर शहरातील अनेक “भाईजान” ची सध्या मोठी गोची झाली असल्याचे दिसून येत आहे…
१ लाख रुपये गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजार रुपये कमिशन घ्या या स्किम चे नगर शहरातील अनेक तरुण शिकार झाले आहेत…पोलीस रेकॉर्ड वर नसले तरी अहमदनगर शहरात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची खात्री दायक माहीती समोर येत आहे…कमी काळात कष्ट न करता लाखो रुपयांची कमाई करण्याच्या नादात अनेल “भाईजान” अक्षरशा कर्जात बुडाले आहेत . १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर काहीही न करता महिन्याला २० हजार रुपयांचा नफा मिळवण्याच्या नादात लोकांन कडून उसणे पैसे घेऊन अनेक तरुणांनी त्या दोन मामूच्या घशात लाखो रुपये घातले….सुरवातीला काही “भाईजान” ला पैसे मिळाले ते पाहून अनेकांनी उधारीवर मार्केट मधून पैसे उचलले ,ज्यांची मार्केट मधे किंमत नाही अश्यानी तर जावई होण्याचा रुबाब दाखवत थेट सासुर वाडीलाच टार्गेट केले…सासू सासऱ्यानं कडून उसणे पैसे घेऊन त्याच दोघा मामूच्या घश्यात ओतले…पाहता पाहता लाखो रुपयांचा आकडा हा कोट्यावधी रुपयात गेला आणि शेवटी त्या दोनही मामूंचा फोन नॉट रिचेबल झाला….मामूचा फोन मागील अनेक दिवसांपासून लागत नसल्याने नगर शहरातील अनेक “भाईजान” सध्या प्रचंड टेंशन मधे आहेत….
पैसे आले का…! हा एकच प्रश सध्या शरातील चहाच्या टपऱ्या,पान स्टॉल ,तसेच चौकातील कट्यांवर सुरू आहे.नगर शहरात घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती पुढील भागात.…