अहमदनगर प्रतिनिधी ~ पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभारा विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता . उद्या २२ जुलै रोजी खासदार नीलेश लंके हे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण करणार आहेत .त्याच्या प्रचारा साठी लंके यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर उपोषणाचे पोस्टर पाठवले आहेत . सदर पोस्टरवर उपोषणाचा पत्ता व ठिकाण हे अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असे देण्यात आले आहे . त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाले आहे .
खासदार नीलेश लंके यांचे उपोषण नेमके कुठे असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. कारण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हे अहमदनगर मधे असून अहिल्यानगर लाजाण्या साठी कुठली बस जाते असा प्रश्न नेटकरी एकदुसऱ्याला विचारत आहेत. खासदार नीलेश लंके हे अहमदनगर दक्षिणीचे खासदार आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
निवडून येताच नीलेश लंके यांनी त्यांच्या लेटर पॅडवर अहमदनगर ( अहिल्यानगर ) असा पत्ता टाकला मागील काही दिवसानं पासून ते लेटर पॅड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहमदनगर शराच्या नावा संदर्भात खासदार नीलेश लंके यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.