Ahmednagar| खा.निलेश लंके यांची शांतीत क्रान्ती ,ज्यांच्या जीवावर निवडून आले त्यांनाच मुर्खात काढण्याचा प्रयत्न..?
लोक सभानिवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा नारा देत सर्वसामान्यांच्या मतांच्या जोरावर अहमदनगर दक्षिणेचे खासदार झालेले निलेश लंके यांच्या दुटप्पी भूमिके बद्दल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे . निवडणुकीच्या प्रचारात अहमदनगर शहराच्या नामांतर संधर्भात लंके यांनी कमालीची चुप्पी बाळगली होती. नामांतराच्या विषयात आत्त्ताच हात घातला तर मुस्लिम मतदार आपल्याला मतदान करणार नाहीत हे लंके यांना माहीत होत. त्या मुळे नगर शहराच्या नामांतरा ऐवजी निवडून आल्यावर नगर शहराचा खऱ्या अर्थाने आपण विकास करणार असे आश्वासन निलेश लंके यांनी निवडणूक काळात दिले होते…
मात्र निवडून येताच खासदार लंके यांनी लगेचच आपल्या अधिकृत लेटर हेड वर अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर हे नाव वापरण्यास सुरवात केली . सध्या खासदार निलेश लंके यांच्या अधिकृत लेटर प्याडची एक प्रत सोशल मीडियावर व्हायरल होतं असून नागरिक या बद्दल आपले मतव्यक्त करत आहेत . अहमदनगर शहराच्या नामांतरा संदर्भात शासन स्तरावर अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसताना . खासदार निलेश लंके हे कोणाला खुश करण्या साठी नगर शराचं नाव स्वताहून बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर प्रत्येकजण विचारात आहे .
उमेदवारी अर्ज दाखल करताना निलेश लंके यांनी आपली उमेदवारी अहमदनगर दक्षिणेतून जाहीर केली होती , सर्व कागद पत्रांवर पत्ता सुद्धा अहमदनगर चाच टाकला होता मात्र निवडून येताच अचानक असं काय घडलकी ज्या अहमदनगर दक्षिणेतून आपण निवडून आलो त्या अहमदनगर च नाव सुद्धा घेण्यास खासदार निलेश लंके यांच्या जिवावर येत आहे. ज्या नावाचं शहर अद्याप अस्तित्वातच नाही ते नाव आपल्या लेटर हेड वर टाकून लंके यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे. अशी चर्चा सध्या शहरात सुरु आहे .शहराचं नाव कुठलं ही असलतरी शहराचा विकास व्हावा ही भूमिका सर्व नागरिकांची आहे मात्र खासदार निलेश लंके यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे सर्व सामान्यांच्या मनात अनेक प्रश निर्माण झाले आहेत .
लोकसभा निवडणूक काळात ज्या वेळेस महायुतीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यानं मधे वाद झाला होता त्या वेळेस प्रचार सोडून खासदार लंके हे विखे यांच्या आगोदर त्या नगरसेवकाला भेटण्या साठी धावत पळत रुग्णालयात गेले,मात्र काही दिवसांपूर्वी समाज कंटकांनी अल्पसंख्यांक मजुरांवर प्राणघातक हल्ला केला त्यात जखमी झालेले कामगार अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेत होते मात्र खासदार निलेश लंके त्या गरीब अल्पसंख्यांक कामगारांना भेटण्या साठी वेळ सुद्धा काढूशकले नाही तसेच त्या घटनेच्या सखोल चौकशीची साधी मागणी सुद्धा पोलीस प्रशासना कडे केली नाही हे विशेष
व्हाट्सअप वर फॉरवर्ड होणारा मॅसेज….