Ahmednagar : अहमदनगर शहरातील एका प्रसिद्ध हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या संचालका ने काही हज यात्रे करुंची फसवणूक केली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे…
हज यात्रे साठी जाण्या करता सौदी अरब सरकारचा हज विजा हा प्रत्येक हज यात्रेकरू साठी बंधन कारक असतो. हज यात्रे दरम्यान टुरीस व्हिजा हा पूर्ण पने बंद असतो टुरीस व्हिजावर सौदी अरब या देशात आलेल्या नागरिकांना मक्का व मदिना या ठिकाणी प्रवेश करण्यास तिथल्या सरकारची सक्त मनाई असते. हज यात्रे साठी लागनऱ्या हज व्हिजा ची रक्कम ही दीड ते पाऊणे दोन लाख रुपयांन पर्यंत असते त्या तुलनेत टुरीस व्हिजा हा फक्त वीस ते पंचवीस हजार रुपयांन पर्यंत मिळतो. हज यात्रे साठी जानाऱ्या प्रत्येक हज यात्रेकरूला हज व्हिजा बंधन कारक असतो. असे असताना सुद्धा अहमदनगर शहरातील एका प्रसिद्ध हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या संचालकने काही हज यात्रे करून कडन हज व्हिजाचे पूर्ण पैसे स्वीकारले व त्यांना व्हिजा संधर्भात कुठल्याही प्रकारची माहिती न देता बक्कळ पैसा कमवण्याच्या लालसेने टुरीस व्हिजा वर सौदीअरब ला नेण्यात आले .हज यात्रा सुरु असताना तेथील यंत्रणेच्या वतीने प्रत्येक हाजीला विशेष ओळख पत्र दिले जाते मात्र अहमदनगर मधील त्या हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या हाजीं कडे ते ओळखपत्र नसल्याचे तेथील यंत्रणेच्या लक्षात आले त्या मुळे तेथील यंत्रणेने लगेच हज यात्रे करू व त्यांच्या सोबत असलेल्या हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले .
त्या कर्मचाऱ्याला सौदी अरब च्या पोलिसांनी जेल मध्ये सुद्धा टाकले असून त्याच्या सोबत असलेल्या हज यांत्रकरूना विशिष्ट ठिकाणी थांबवण्यात आले असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे .चाळीस दिवसांची हज यात्रा पूर्ण झाली असून हज यात्रेकरू परतण्यास सुरवात झाली आहे शहरातील सर्व हजयात्रे करू परतल्यावरच सत्य समोर येणार आहे .