अहमदनगर (प्रतिनिधी)- विश्व मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नावेद शेख यांनी अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी अब्दुल करीम शेख यांची निवड करून निवडीचे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष नावेद शेख, नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख, राजू शेख, सोनू शेख, तौसीफ शेख, सोहेल शेख, मुबारक सर, भैया शेख आदी उपस्थित होते.
नगर शहरात विश्व मानवाधिकार परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष नावेद शेख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्या करून अल्पसंख्यांकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचे कार्य करणार असल्याची भावना नूतन शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख यांनी व्यक्त केली व लवकरच शहरांमध्ये विश्व मानवाधिकार परिषदेचे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. व या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.