अहमदनगर – अहमदनगर शहर उपनगरातील मुकुंदनगर या भागामध्ये सोमवारी रात्री तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारी टोळी एवढ्यावरच थांबली नाही तर १० ते १२ जणांच्या टोळक्याने वाबळे कॉलनी ते बडी मस्जिद पर्यंत एकच धुमाकूळ घातला होता या संदर्भात भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नदीम सय्यद, मोहसीन सय्यद उर्फ गुड्डू, अनिस शेख, अन्सार शेख यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला खरा मात्र शहर परिसर व उपनगरात उध्दभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला पायदळी तुडविणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यात अहमदनगर पोलीस सपशेल फेल झाल्याची भावना नगरकरांमधून व्यक्त होत आहे. मुकुंदनगर परिसरामध्ये या आधी अनेक टोळी युद्ध पाहायला मिळाले मात्र आता या परिसरामध्ये पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे म्हैसावाली गॅंग नावाची नवीन टोळी उदयास आली आहे या टोळीच्या मोहरक्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहे असं असतांना देखील हि टोळी बिनधास्तपणे दहशद माजवत असल्याने याला जबाबदार कोण हाच प्रश्न आता मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना पडला आहे.
सोमवारी रात्रीच्या वेळी नव्याने उदयास आलेल्या म्हैसावाली गॅंगच्या मोहरक्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी इरफान सय्यद फैब्रीकेशनवाले यांच्या राहत्या घरी दगडफेक केली तसेच चारचाकी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. दरम्यान पीडितांनि पोलीस ठाणे गाठले असता या गँगच्या सदस्यांनी भिंगार कँम्प पोलीस ठाण्याच्या परिसरात जाऊन पीडितांना धमकाविण्यास सुरवात केली गँगच्या सदस्यांची मजल एवढी कि त्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यास दबाव आणल्याची चर्चा देखील आज दिवसभर मुकुंदनगर परिसरात होत होती. एवढेच नव्हे तर सोमवारी रात्रीचे भिंगार कँम्प पोलीस ठाण्याचे CCTV तपासल्यास कोण कोणत्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन देत होता हे लक्षात येईल अशी प्रतिक्रिया देखील नागरिकांमधून दबक्या आवाजात येत आहे..
खरंतर जिल्हाचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक टोळ्यांवर मोक्का तसेच तडिपाराची कारवाई केली. मात्र मुकुंदनगर या उपनगरात नव्याने उदयास आलेल्या म्हैसावाली गॅंगला भिंगार कँम्प पोलीस पाठीशी घालत तर नाही ना ? अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे… सोमवारची रात्र हि मुकुंदनगर परिसरातील नागरिकांसाठी कत्तलची रात्र असल्याचा अनुभव येथील नागरिकांनी अनुभवाला आहे. खरंतर तोफखाना पोलीस ठाण्यानंतर भिंगार कँम्प पोलीस मुकुंदनगर येथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरल्याचे दिसते त्याला कारण म्हणजे सोमवारी रात्री मुकुंदनगर परिसरातील इंडिया बेकरी तसेच अहेमद रजा चौक या ठिकाणी म्हैसावाली गॅंगचे सदस्य चक्क पोलिसांसमोरच लाठ्या काठ्यासह दुचाकी वाहनावर ये जा करत होते मात्र पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे.एवढेच नव्हे तर या ठिकाणी असलेले CCTV तपासल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे मत येथील नागरिक व्यक्त करत आहे. त्यामुळे आता तरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे नव्याने उदयास येणाऱ्या टोळ्यांना जरब बसवून त्यांच्यावर कडक कारवाई करतील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे एवढेच….