ऑनलाईन सट्टा – गळाला लागला छोटा मासा मात्र त्या मगरीच काय ; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न? पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या त्या पर्वताला पोलिस अधीक्षक ओला लावणारं का सुरुंग!
अहमदनगर – सध्या T20 वर्ल्डकप सुरू आहे. मात्र या वर्ल्डकपच्या शर्यतीत अहमदनगरच्या हायवेवर ऑनलाईन सट्टयाचा सुळसुळाट सुरू झाला आहे. शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टयामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.
दरम्यान कोतवाली पोलिसांनी ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. मात्र अटक करण्यात आलेला आरोपी हा फ़क्त मासा असून त्या मगरीवर पोलिस कारवाई करण्याची हिम्मत दाखविणार का! अहमदनगर शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टयाच्या बुकीची पोलखोल News Alert ने केली आहे. मात्र पोलिसांचा ‘अर्थ’ पूर्ण आशीर्वाद पैश्याची पर्वते बांधणाऱ्या बुकीला असल्याने पोलिसही त्याच्यावर कारवाई करत नसल्याची चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे.
आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व. कसलीही तक्रार न करता हे अस्तित्व रक्ताचे पाणी करून राब राब राबते. स्वतःच्या अंगावर फाटके वस्त्रे, तुटक्या चपलांनी रस्ते तुडवते. कुटुंबासाठी मात्र निवारा बांधते. परंतु मुलं मोठी होतात अनं ऑनलाईन सट्टा चालवून पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या बुकीच्या आहरी जातात.
एकीकडे सट्टयात उध्वस्त झालेल्या तरुण युवकाचा बाप जर्जर झालेल्या शरीराची तक्रार न करता आयुष्याचा जमाखर्च अंधारल्या खोलीत मांडत बसलेला असतांना दुसरीकडे मात्र ऑनलाईन सट्टयाच्या माध्यमातून पैश्याचे पर्वते बांधणारा तो बुकी रक्ताचे पाणी करून जर्जर झालेल्या त्या बापाच्या शरीराच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत आहे. मात्र पोलिसांना साधी करवाईही करायला जमत नाही हे विशेष
वर्षाच्या ३६५ दिवस चालणारा हा ऑनलाईन सट्टा आज वर्ल्डकपच्या मोसमात तुफान फटकेबाजी करत आहे. या फटकेबाजी मध्ये बरबाद होताहेत ते फ़क्त तरुण युवक आणी मालामाल होतं आहे तो बुकी. एवढेच नाही तर युवकांच्या उध्वस्त कुटुंबाच्या जीवावर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून इमारती बांधण्याचा काम हा बुकी करत आहे.
पोलिसांचे असलेले ‘अर्थ’ पूर्ण आशीर्वाद! , युवकांच्या मूडद्यावर पाय ठेवून जमविण्यात आलेली बक्कळ माया , त्या मायेच्या माध्यमातून समाजात कॉन्ट्रॅक्टरच्या नावारूपाने फिरणारा तो बुकी पुढे जाऊन निवडणुका लढविणार, जनतेचा प्रतिनिधित्व करणारं आणी कीड लागणार ती आख्ख्या समाजाला.
मात्र आता जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षकांनींच यामध्ये जातीने लक्ष घालून समाजाला लागणाऱ्या त्या किड्यावर फवारणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर पूर्वीपासून पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या त्या बुकीला आपल्या खात्यातुन मिळणाऱ्या अभयाच्या चर्चेची देखील चौकशी करण्याची गरज आहे! अन्यथा समाजात लावण्या जाणाऱ्या या कीड ला तुम्हीही तितकेच जबाबदार राहणार यात तिढ्मात्र शंका नाही! एवढेच
पुढच्या भागात पहा त्या…..57 एँँपचे पुराव्यासह व्हिडिओ क्लिप