ऑनलाईन सट्टयाचा बुकी बघतोय नगरसेवकाचे स्वप्न ; मात्र एक्जिट पोलनुसार झाली कारवाईची मागणी ; पोलिस मात्र आंधळ्याच्या भूमिकेत?
अहमदनगर – अहमदनगर मध्ये पोलिस परवानगी घेऊन ऑनलाईन सट्टा चालू आहे की काय असा प्रश्न सर्व सामान्य माणसाला पडला आहे?. तर दुसरीकडे ऑनलाईन सट्टा चालवून पैश्यांची पर्वते बांधणारा तो बुकी मात्र येणाऱ्या निवडणूकीत नगरसेवक होण्याचे स्वप्न बघत आहे. असं असलं तरी News Alert ने एक्जिट पोल नुसार नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणुन घेतल्या असता अश्या बुकीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या T20 वर्ल्डकप सुरू आहे मात्र अहमदनगर शहरामध्ये या वर्ल्डकपच्या मँचवरच लाखों रुपयांचा ऑनलाईन सट्टा लावला जात आहे! या ऑनलाईन सट्टयासंदर्भात News Alert ने बातम्या देखील प्रसारीत केल्या आहे. मात्र पोलिसांनीं अश्या बुकीवर साधी चौकशी करण्याची देखील हिम्मत दाखवली नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल!.
अनेक तरुण युवक ऑनलाईन सट्टयाच्या आहरी जाऊन आपले कुटुंब उध्वस्त करत आहे. आणी ऑनलाईन सट्टा चालवीणारे मात्र याचं तरुण युवकांच्या उध्वस्त कुटुंबावर पाय ठेवत पैश्यांची पर्वते बांधण्याचे काम करत आहे. एवढेच नव्हे तर बरबाद तरुण युवकांच्या टाळूवरच लोणी खातं हा बुकी नगरसेवक होण्याच स्वप्न पाहत आहे. मात्र एक्जिट पोल मध्ये तब्बल ३ हजार ४०० नगरकरांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर याचं एक्जिट पोल मध्ये नागरिकांनीं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिस कारवाई करणारं नाही असं मतं नोंदविल्याने पोलिसांच्या परवानगीनेच शहरातील बुकी ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची चर्चा शहरात होतं आहे?
दरम्यान अहमदनगरच्या हायवेवर ऑनलाईन सट्टयाच्या माध्यमातून हवाल्याचा काळाबाजार देखील होतं आहे! ऑनलाईन सट्टा खेळण्यासाठी लागणाऱ्या सट्टयाच्या एपसाठी एक विशिष्ठ रक्कम मोजली जाते त्या रकमेच्या ४०% टक्के रक्कम हा एकटा बुकी घेतो आणी उर्वरित ६०% टक्केच्या रकमेमध्ये सट्टा खेळतात ते तरुण युवक आणी बरबाद होतात. एवढेच नव्हे तर बरबाद झालेल्या तरुण युवकांच्या त्या ६०% टक्क्यामध्ये देखील बुकीचा वाटा असतो. आणी म्हणून तरुण युवकांच्या मुडद्यावर पाय देऊन पैश्यांची पर्वते बांधणारा तो बुकी बक्कळ माया जमा करून निवडणूक लढविण्याची देखील तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या माकडाच्या भूमिकेत असलेल्या पोलिसांनी? खरी पोलिसगिरी करून तरुण युवकांच्या उध्वस्त होणाऱ्या कुटुंबाला वाचविण्याची गरज आहे.