उपप्रादेशिक कार्यालयाचा भोंगळ कारभार? दिवसातून तब्बल ३० गाड्यांना मिळतो स्टार! ; दिवाळीनंतर देखील दीन क़े उजाले मे ‘शाम’च्या चमकदार स्टारची होतीय चर्चा !
अहमदनगर – अहमदनगर उपप्रादेशिक कार्यालयाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहे?. दिवाळी संपली असतांना देखील दीन क़े उजाले मे ‘शाम’च्या चमकदार स्टारची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली आहे.
वास्तविक आरटीओ कार्यालयात दिवसभरात अनेक गाड्यांची फिटनेस चाचणी होते. गाडी अनंफिट असल्यास त्याला संबधित गाडीचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. मात्र वेळ वाचत असल्याने तसेच नेमकी प्रक्रिया स्वतःला माहिती नसल्याने ग्राहक दलालांची मदत घेतात. दलाला मार्फत गेले की, काम झटपट होते. म्हणून अहमदनगर आरटीओ कार्यालयात त्या दोन दलाला मार्फत गेलेल्या ग्राहकांची गाडी अनंफिट जरी असली तरी त्याला अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात!
फिटनेस चाचणीत त्या दोन दलाला मार्फत तपासणीसाठी आलेली गाडी अनंफिट जरी असली तरी संबंधित अधिकारी त्या गाडीला पास करून देतो? संबंधित गाडी पास करण्याची पद्धतही निराळीच आहे ती म्हणजे त्या दोन दलाला मार्फत आलेल्या गाड्या अनंफिट असल्यास ‘तो’ अधिकारी त्या गाडीच्या कागदपत्रावर ‘स्टार’ काढतो. विशेष म्हणजे एका ‘स्टार’ची सुरवात ५०० रुपयांपासून सुरू होते. दीन क़े उजाले मे शाम क़े स्टार चमकवीणाऱ्या त्या अधिकाऱ्यांने जर दोन स्टार दिल्यास ग्राहकाला तब्बल १००० हजार रुपये मोजावे लागते. आणी आलेल्या पैश्यांमध्ये ते दलाल आणी अधिकारी करतात ते म्हणजे फिफटी – फिफटी?
एका स्टारची किंमत ५०० रुपये असे दर ठरलेले असून दिवसातून तब्बल ३० ते ३२ गाड्यांना स्टार देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान एका गाडीला जर एकच स्टार दीला गेला तर ५०० रुपये दराप्रमाणे दिवसातील ३० गाड्यांचे तब्बल १५००० हजार रुपये संबंधित अधिकारी आणी संबंधित ते दोन दलाल एका दिवसात फिफटी – फिफटी करत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
आरटीओतील अधिकाऱ्यांसोबत त्या दलालांचे लागेबांधे असल्याने ! त्या दोन दलालांचा वावर ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एखादा ग्राहक त्या दोन दलालाविना थेट गेल्यास त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणी याचाच फायदा त्या दोन दलालांच्या माध्यमातून अधिकारी घेत असल्याची चर्चा शहरात होतं आहे. त्यामुळे त्या दोन दलालांना अभय कोण देत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. आणी म्हणून उपप्रादेशिक कार्यालयाच्या आबरूची लक्तरे काढणाऱ्या अश्या अधिकारी आणी त्या दलालांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नगरकर करत आहे. एवडेच.