ऑनलाईन सट्टा – उत्साह और गर्म ‘ जोशी ‘ क़े साथ पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या त्या बुकींवर होणारं कारवाई! पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले कारवाईचे आदेश
अहमदनगर – T20 वर्ल्डकपच्या मोसमात पोलिसांच्या नाकावर टिचुण अहमदनगर मध्ये उत्साह व गर्म ‘जोशी‘ क़े साथ ऑनलाईन सट्टयाच्या माध्यमातून पैश्यांची ‘पर्वते‘ बांधणाऱ्यांंवर संक्रांत येणारं आहे. तसे आदेशच नवीन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहे.
t20 वर्ल्डकपच्या मोसमात तरुण युवकांचे संसार उध्वस्त करून मोठ्या गर्म ‘जोशी‘ने पैश्यांची ‘पर्वते‘ बांधणारे बुकी बक्कळ माया जमवीत आहे. दरम्यान अहमदनगर मध्ये ऑनलाईन सट्टयाचे जाळे इतके पसरवीण्यात आले आहे की आता पैश्यांची ‘पर्वते’ बांधणारे हे बुकी गर्म ‘जोशी‘ क़े साथ आणखीन जोमाने तरुण पिढ्यांना बरबाद करण्याचे काम करत आहे. तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या या सटूडेबाजांच्या विरोधात NEWS ALERT ने वाचा फोडली. मात्र तरी देखील पोलिसांच्या नाकावर टिचुण हे बुकी राजरोसपणे ऑनलाईन सट्टयाचा कारभार करत आहे.
मात्र आता जिल्ह्याला लाभलेले नवीन पोलिस अधीक्षकांनीं NEWS ALERT.च्या बातमीची दखल घेत गर्म ‘जोशी‘ने पैश्यांची ‘पर्वते‘ बांधणाऱ्या सटुडेबाज बुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. एवढेच नाही तर लवकरात लवकर कारवाई करण्याची खात्री पोलिस अधीक्षकांनीं नगरकरांना दिली आहे.
शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टयामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. एक बाप आयुष्यभर मुलांसाठी तडफडत टाचा झिजलेल्या चपला घालतो. मात्र आज गर्म जोशी क़े साथ काम करत पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या या बुकिंनीं स्वतःच्या नशीबाची भोकं त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यावर पाडली आहे.
विशेष म्हणजे…..57 अश्या आशयाच्या आयडीवर अहमदनगर मध्ये ऑनलाईन सट्टा चालत असल्याचे नगरकर बोलताहेत! विशेष ही आयडी फ़क्त त्या बुकीकड़ेच नाही तर त्याने त्याच्या एक ना अनेक साथीदारांनां देऊन त्यांच्याकडून देखील कमिशन खाण्याचा धंदा सुरू केला. आणी त्या ….57 वर खेळण्यात येणाऱ्या सट्टयामुळे उध्वस्त झाले ते फ़क्त तरुण युवक.
त्यामुळे …..57 च्या सटूडेबाज बुकीची हकीकत दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आणी करत राहणारच. एवढेच नाही तर पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या पर्यंत अद्याप पोलीसही पोहचू शकले नाही ते आम्ही आमच्या बातमीच्या माध्यमातून करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र आता गर्म ‘जोशी‘ क़े साथ तरुण युवकांचे मूडदे पाडून त्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचे काम करून पैश्यांची ‘पर्वते‘ बांधणाऱ्यां त्या बलाड्य पर्वतांवर पोलिस अधीक्षकांनींच कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.