संडे स्पेशल..
कथा लोभी कुत्र्याची….शिकवण मात्र माणसांना
……या कथेत मुख्यभूमिका ही एका लालसेने भरलेल्या लोभी कुत्र्याची आहे. एका गावात एक कुत्रा राहत असतो तो खूप लोभी असतो लोभी म्हणजे लालची. त्याच्या या लालसी पणामुळे कोणताही पशु प्राणी त्याच्या सोबत मैत्री करत नव्हते. गावातील बाकी सारे कुत्रे व अन्य पशु जेवायला एक दुसऱ्यासोबत बसत होते. मात्र या कुत्र्याच्या लालसापोटी तो नेहमीच एकटा राहिला. खाण्यापिण्याची मजा मात्र या एकट्याने पुरेपुर घेतली होती बरका. तो खाताना सर्वांना डिवचुन डिवचुन दाखवत खायचा त्यामुळेच बाकी सारे कुत्रे त्या कुत्र्याचे दुश्मन झाले होते.
दिवस जात गेले ऐके दिवशी या लालसी कुत्र्याला एक मोठा हाड मिळाला. त्या हाडाला बघुन तो खूप खुश झाला. आणी त्या हाडाला आपल्या दातात पकडून जंगलाकड़े गेला. त्याने वीचार केला की जंगलाकड़े जाऊन मजा घेत घेत आज हाड खाऊ. तो हाडाला दातात धरून एक ना अनेक वीचार करत होता. जंगलाकड़े जाताना मध्ये एक नदी लागली आणी नदी वर एक पुल बांधला गेलेला होता. त्याला पुल ओलांडून जंगलात जायचे होते. ज्या वेळी तो पुल ओलांडत होता त्यावेळी त्याला नदीच्या पाण्यात स्वःतची सावली दिसली. त्या पाण्यात दिसलेल्या सावलीमुळे त्याला वाटले की पाण्यात आणखीन एक कुत्रा आहे. आणी त्याच्या तोंडात देखील तसेच हाड आहे जे आपल्या तोंडात आहे.
पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातील हाड बघून या कुत्र्याचा लालसा (लोभ) आणखीन वाढत गेला. त्याच्या मनात आले की त्याच्या तोंडातला हाड खेचून आणू आणी तेही आपल्याला ठेवू आणी जंगलात जाऊन दोन्ही हांडाची मजा घेऊ. या विचारांच्या कल्पनेनेच त्याच्या मनात आनंदाचा फुगा फुटला. आणी त्याने पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातील हाड घेण्याचा वीचार केला. डोक्यात आलेला विचार खरं करण्याच्या नादात त्याने पाण्यातल्या कुत्र्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. भुंकण्याच्या नादात जसाच त्याने तोंड उघडले तेवढ्यात त्याच्या तोंडातील हाडूक पाण्यात पडला.आपल्या तोंडातला हाडुक पाण्यात पडल्याने त्याच्या डोक्यात आलेल्या कल्पना आणी विचारांना अखेर तिलांजली मिळाली. आणी त्यावेळी त्या कुत्र्याला कळाले की लालसामुळे कधीच कुणाचा भला होत नाही. लोभचा शेवट हे वाईटच असतो.
घडलेल्या या घटनेमुळे तो कुत्रा निराश झाला आणी तो जुन्या मित्राकड़े जाऊन केलेल्या चुकाबद्दल त्यांची माफी मागायला लागला आणी त्याने एक निश्चय केला की यापुढे तो कधीही लोभ लालसा करणारं नाही
या कथेमुळे आपल्याला एक शिकवण मिळाली की ज्या प्रमाणे त्या कुत्र्याने लोभापाई जवळ असलेला हाड देखील गमावला त्या प्रमाणे जीवनात देखील माणसांकड़े जे आहे त्यातच समाधान मानावे एवढेच.
संपादक
जावेद शकूर….