भाग….८
ऑनलाईन सट्टा – पोलिसांचा ‘अर्थ’ पूर्ण आशीर्वाद? अन् पहिल्याच इनिंग मध्ये बुकींनीं बांधले पैश्यांची पर्वते!
अहमदनगर – अहमदनगर शहराच्या हायवेवर धावनारा ऑनलाईन सट्टा रविवार पासुन पुन्हा मोठ्या जोमाने सुरू झाला आहे. परंतु पोलिसांचा असलेला ‘अर्थ’ पूर्ण आशीर्वाद? अन् कारवाई करण्यासाठी होणारी डोळेझाक त्यामुळे ऑनलाईन सट्टयाच्या पहिल्याच इनिंग मध्ये भरघोस कमाई करत पैश्यांची पर्वते बांधणारा तो बुकी टुन्न होऊन अनेकांच्या तळतळाटाचा राक्षस बनला आहे.
मात्र पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या त्या
बलाड्य बुकिंना तरुण युवकांच्या कुटुंबाचा तळतळाट दिसणार कसा तो तर अनेकांना आपल्या पैश्याच्या जोरावर खरेदी करून धंदा करतोयना.
अहो अहमदनगर शहरामध्ये बुकिंनीं ऑनलाईन सट्टयाचा बाजार थाटून अतिक्रमण केले आहे. मात्र त्यांच्या ऑनलाईन सट्टयाच्या अतिक्रमणावर पोलिस कारवाई का करत नाही! पोलिसी खाक्या दाखवताच घाबरनारे हे बुकी तरुण युवकांच्या जीवावर उठलेले असतांना अश्या बुकींना पाठीशी घालण्याचे काम पोलिस करताहेत का? हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
रविवार पासून t20 वर्ल्डकप सुरू झाला. सुरू झालेल्या या सत्रातील पहिल्याच इनिंग मध्ये एक ना अनेक तरुण युवकांना ऑनलाईन सट्टयाच्या माध्यमातून बळीचा बकरा करण्याचे काम करण्यात आले. असे शहरात दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या इनिंग मधुन आलेल्या करोडोची कमाई आता अहमदनगर शहराच्या हायवेवर हवाल्याच्या माध्यमातून धावणार, करंट अकाउंट मध्ये बुकी बक्कळ माया जमविणार आणी उध्वस्त होणारं ते फ़क्त तरुण युवक. मात्र या तरुण युवकांच्या कुटुंबाला न्याय देणारं कोण! लाखों रुपयांच्या कर्जाचा डोंगर आपल्या खांद्यावर घेऊन जगणाऱ्यांंना खरंच आहे का कोणी वाली असा प्रश्न आज उध्वस्त तरुणांनाच्या बापाकड़े बघुन पडत आहे.
त्याला कारणं म्हणजे पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या त्या बुकीने पैश्याच्या जोरावर सट्टयाची मार्केटिंग करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शहरात दांड्या देखील नाचवल्या होत्या तेव्हापासून तो गावभर फिरत बिनधास्तपणे सांगतोय की माझ्याकड़े बक्कळ पैसा असून माझ्यावर पोलिस कारवाई करणारं नाही. खरंतर असं सांगत तो बुकी पैश्याचा जोरावर थेट पोलिसांनाच आव्हान देत आहे. .
त्यामुळे पोलिसांनीं ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या बुकींना आता खऱ्या पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे अशी मागणी नागरिकांमधुन दबक्या आवाजात करण्यात येत आहे.