Ahmednagar – पैसा लयच वंगाळ असतो असं वक्तव्य वयस्कर म्हतारे नेहमीच करत असतात मात्र याचा प्रत्यय शहरातील रिक्षा चालकांना येत आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला आमजत नावाचा खाजगी एजंट वाहतूक शाखेच्या नावाखाली चांगलीच माया गोळा करत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखा या आमजतला शोधून हा आमजत नेमका आहे तरी कोण याची चौकशी करून कारवाई करणार का हेच पाहणे महत्त्वाचे आहे.
शहरात एक ना अनेक रिक्षा चालक आपल्या पोटाची खळगी भागविण्यासाठी दिवसरात्र कष्ट करून आपले कंबरडे मोडून रिक्षा व्यवसाय करतात मात्र आमजत नावाचा व्यक्ती हा संबंधित रिक्षा चालकांना त्रास देऊन वाहतूक शाखेच्या नावाखाली दर महिन्याच्या पहिल्या तारखेला माया जमा करत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. यामध्ये वाहतूक शाखेचा कितपत हात आहे कि नाही हे चौकशी झाल्यावरच कळेल मात्र सध्या तरी ज्या आमजत नावाची चर्चा रंगू लागली आहे हा आमजत आहे तरी कोण याची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे.
अहमदनगर शहरातील हजारो रिक्षा चालक विविध मार्गावर आपला व्यवसाय करतात कोणी संभाजीनगर मार्ग तर कोणी केडगाव मार्ग तर कोणी भिंगार मार्ग मात्र भिंगार मार्गावर पोट भरण्यासाठी जाणाऱ्या एक ना अनेक रिक्षा चालकांना या आमजत नावाच्या व्यक्तीचा त्रास होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहीनुसार एका रिक्षा चालकांकडून महिन्याच्या एक तारखेला आमजत प्रत्येकी ५०० रुपये जमा करतो, उदाहरण भिंगार मार्गावर जर ५० रिक्षा असल्यास प्रत्येकी ५०० प्रमाणे हा आमजत हजारो लाखोंची माया वाहतूक शाखेच्या नावावर जमा करत असल्याची चर्चा सध्या शहरासह भिंगार परिसरात रंगू लागली आहे त्यामुळे वाहतूक शाखा या आमजतचा शोध घेऊन कारवाई करणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, एवढेच नव्हे तर या प्रकरणामध्ये कोणी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचा हात असल्यास पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे….