Ahmednagar– अहमदनगर शहर परिसरातील भिंगार या उपनगरात वाहतूक शाखेच्या नावावर माया जमविणाऱ्या आमजतची पोलखोल न्यूज अलर्टने केल्यानंतर देखील वाहतूक शाखा आमजत बाबत ठोस पावले उचलताना दिसत नाही त्यामुळे आमजतचे पाठीराखा हा नगर शहर वाहतूक शाखेचाच घरभेदी असल्याची चर्चा आता शहरात होत आहे. अहमदनगर शहरात व शहराच्या उपनगरात हजारोंच्या संख्येने रिक्षा चालक आहे. आपल्या पोटाची खळगी भागविण्यासाठी दिवस रात्र रिक्षा चालवून आपला संसार चविण्याचा प्रयत्न रिक्षा चालक करत आहे. मात्र त्यांच्या संसारात विष कालविण्याचे काम आमजत नामक व्यक्ती करत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. वाहतूक शाखेच्या नावाखाली भिंगार या उपनगरात चालणाऱ्या रिक्षा चालकांकडून हजारो लाखो रुपयांची माया हा आमजत जमा करत असल्याची बाब समोर आली आहे ? महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला आमजत नावाचा व्यक्ती वाहतूक शाखेच्या नावावर प्रत्येकी एक रिक्षा चालकाकडून ५०० रुपये घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येकी एका रिक्षा चालकाकडून ५०० रुपये प्रमाणे भिंगार परिसरात चालणाऱ्या शेकडो रिक्षा चालकांकडून हजारो लाखों रुपयांची माया हा आमजत जमा करत असल्याचे बोलले जात आहे.
गोरगरीब रिक्षा चालकांना लुटणाऱ्या हप्तेखोर आमजत बाबत न्यूज अलर्टने बातमी प्रसारित केली होती आमजत आहे तरी कोण याची चौकशी करून वाहतूक शाखेने त्यांची बदनामी करणाऱ्या या आमजतवर कडक कारवाई करावी अश्या आशयाची बातमी प्रसारित केली. मात्र बातमीला २४ तास उलटून देखील आमजत आहे तरी कोण याची साधी माहिती घेण्याची दखल देखील वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून घेण्यात आली नाही ? त्यामुळे आमजतचे पाठीराखे वाहतूक शाखेचे कर्मचारी तर नाही ना अशी शंकाच आता नागरिकांना येत आहे.
दरम्यान न्यूज अलर्टने बातमी प्रसारित केल्यानंतर शेपूट हालवत हप्तेखोर आमजत हा काही दलालांकडे जाऊन चौकशी करत होता अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यावेळी त्या संबंधित दलालांनी तुझे काहीही वाकडे होऊ शकत नाही अशी चर्चा त्यांच्यात झाली ? हप्तेखोर आमजत आणि त्या दलालामध्ये झालेल्या चर्चेनंतर हप्तेखोर आमजत हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना खरंच बंद पाकिटात ठेवत असल्याची आता एकच चर्चा होत आहे. एवढेच नव्हे तर वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्याच्या जीवावर व त्याच्या सांगण्यावरूनच आमजत हा रिक्षा चालकांकडून हप्ते गोळा करत असल्याची चर्चा होत असल्याने वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित हप्तेखोर आमजतवर कठोर कारवाई करून वाहतूक शाखेतल्या त्या घरच्या भेंदीला देखील शोधून काढण्याची गरज आहे. अन्यथा हप्तेखोर आमजत बरोबर तो घरचा भेदी वाहतूक शाखेची लक्तरे वेशीला टांगविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की….
भाग ३ मध्ये पहा कोण आहे आमजतचा पाठीराखा व शाखेतला घरभेदी….