अहमदनगर – कोतवाली पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची अहमदनगर जिल्ह्यात नियमाचा उल्लंघन करून बदली केल्याप्रकरणी नाशिक विभागाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर आणि तात्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बदली केल्याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहे. त्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची अडचण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खरंतर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची नियमाचा उल्लंघन करून बदली करण्यात आली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी २६ डिसेंबर २०२२ रोजी केली होती त्यानुसार गृह विभागाने शाकीर शेख यांच्या पत्राची दखल घेत पोलीस महासंचालकाला एप्रिल महिन्यात आदेश काढले आहे. गृह विभागाने काढलेल्या आदेशात पोलीस महासंचालकांनी संबंधित बदली प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी २०२२ साली दाखल केलेल्या तक्रार अर्जात संपत शिंदे हे वरिष्ठांवर राजकीय दबाव आणत असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची २०२१ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात बदली केली होती. हि बदली तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती असं तक्रार अर्जात नमूद करण्यात आला आहे. मात्र करण्यात आलेली हि बदली नियमाचा उल्लंघन करून करण्यात आली आहे असा आरोप शाकीर शेख यांनी केला आहे. तसेच अधिनियमामध्ये
तात्पुरते संलग्न करणे अशी तरतुद नसल्याने कोणताही अधिकारी यांनी तात्पुरते संलग्न करणे चे आदेश काढून बदली करण्यात येऊ नये. काही विशेष कारणामुळे पोलीस अधिकारी यांची बदली करणे आवश्यक असल्यास बदली करण्यात येते ते देखील परवानगी घेऊन मात्र सप्त शिंदे यांची बदली करताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नसून सर्व नियमांना धाब्यावर बसविण्यात आले असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.
दरम्यान शेख यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची २०१६ पासून तर २०२१ पर्यत जिल्हयातच बदली करण्यात आली खरंतर गृह विभागाचे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचे बदली करताना पोलीस अधिकारी यांची त्यांच्या मुळ जिल्हयामध्ये बदली करण्यात येऊ नये अश्या पध्दतीचे नियमात तरतुद आहे. मात्र अस असतांना देखील २४/०९/२०२१ रोजी सर्व नियमांना तिलांजली देत संपत शिंदे यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. दरम्यान या बदली प्रकरणाची गृह विभागाने दखल घेतली असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहे. त्यामुळे या बदली प्रकरणी चौकशी झाल्यास तत्कालीन पोलीस अधीक्षकांसह तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची अडचण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे….