अहमदनगर शहरात विठ्ठल भोर या माजी सैनिकांच्या छातीत स्क्रूड्राइव्हर घालून हत्या करण्यात आली या हत्येनंतर पोलिसांनी अहमदनगर शहरातील एका सांयदैनिकाच्या संपादकाला आणि त्याच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. खरंतर अहमदनगर शहरातील विठ्ठल भोर हा माजी सैनिक २९ जुलै रोजी त्याच्या राहत्या घरातून बेपत्ता होतो. घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याची मिसिंग कम्प्लेंट तोफखाना पोलीस ठाण्यात दिली जाते अनं ३० जुलै रोजी विठ्ठल भोर या माजी सैनीकाचा लोणी येथे मृतदेह आढळला जातो.
बेवारस आढळून आलेला मृतदेह कुणाचा याबाबत चौकशी करत असतांना मिसींग झालेला माजी सैनीकाचाच हा मृतदेह असल्याच निष्पन्न होत. दरम्यान आढळून आलेल्या माजी सैनिकाचा चक्क खून करण्यात आलं असल्याच स्पष्ट होताच पोलीस तपास वेगाने होतो. आणी यात आरोपी निष्पन्न होतो तो शहरातील पत्रकार संपादक मनोज मोतीयानीं. तस पाहिलं तर या पत्रकारावर अनेक गुन्हे दाखल असल्याच पत्रकच स्थानिक गुन्हे शाखेने दिला आहे. पत्रकारीतेच्या नावाखाली अनेकांचा घेतलेला तळतळाट या निमित्ताने समोर आला. मात्र शहरातील अश्या पत्रकारामुळे पत्रकारितेला लागलेला कलंक हें मात्र वेळोवेळी आठवण करून देणारा आहे हें मात्र नक्कि. खरंतर या पत्रकारावर अनेक गुन्हे दाखल असतांना देखील त्याला अटक होतं नसेल तर अश्या पत्रकाराला पाठीशी घालणारे कोण याची देखील सखोल चौकशी होने गरजेचे आहे.
अहमदनगरच्या पत्रकारितेत गुन्हेगारांचा तर शिरकाव झाला नाही ना? आता असे प्रश्न समोर येऊ लागले आहे. त्याला निमित्त म्हणजे काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यां रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात बाळ बोठे नावाच्या पत्रकाराचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात पुढं आलं. त्या प्रकरणात बोठेला अटकही झाली. त्यानंतर आता पुन्हा माजी सैनिकाच्या खून प्रकरणात मनोज मोतीयानी नावाच्या संपादकाला अटक करण्यात आली.वास्तविक पाहता अहमदनगरच्या इतिहासात नगरी पत्रकारिता हि निर्भीड पत्रकारिता मानली जात होती मात्र त्या निर्भीड पत्रकारितीची मजल ब्लँकमेल करण्यापासून तर थेट ठार मारण्यापर्यंत गेली आहे. याला जबाबदार कोण. अश्या पत्रकारांना पाठीशी घालणारे पोलीस की अश्या पत्रकारांना थारा देणारे अन्य…? हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाळ बोठे असों किंवा मनोज मोतीयानीं यांना पाठीशी घालणारे खरें विलन हें पोलीसच ? असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कारणं रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेला बाळ बोठे याच्यावर देखील एक ना अनेक तक्रारी होत्या मात्र संपादकाच्या खुर्चीवर बसलेल्या बोठेंचे कनेक्शन वरपर्यंत असल्यामुळे त्याला आवरणार कोण हाच प्रश्न पोलिसांसमोर होता आणि आता देखील घडले तेच माजी सैनिक हत्या प्रकरणातील आरोपी असलेला मनोज मोतीयानीं याचा जमिनीच्या वादात न्यायालयाने अटक वारंट काढून देखील पोलीस ठाण्यात बसलेला ‘मोती’ यानी हा पोलिसांना सापडत नव्हता अशी चर्चा देखील आता जोर धरू लागली आहे. आरोपी मनोज मोतियानी हा साहेबांच्या कॅबीन मध्ये बसवून साहेबांसोबत हास्य जत्रा भरवत असताना कॅबिनच्या बाहेर मात्र पोलीस कर्मचारी हे न्यायालयाच्या वारंटवर आरोपी मिळत नसल्याची बतावणी करत होते ? अशी देखील चर्चा या निमित्ताने होत असताना याला साहेब देखील तितकेच जबाबदार नाही का ?
अनेक तक्रारी दाखल असलेल्या आरोपी मनोज मोतियानी याला पोलिसांनी वेळीच पायबंद घातले असते तर भोर नामक माजी सैनिकाची हत्याच झाली नसती . माजी सैनिक भोर आणि आरोपी मनोज मोतियानी यांच्यामध्ये जमिनीचा वाद असल्याचं बोलले जात आहे एवढेच नव्हे तर मनोज मोतियानी या आरोपीने अनेकांना गंडा घातल्याचे देखील समोर आले आहे. अनेकांना गंडा घातल्यानंतर आरोपीवर शासन व्हावे या हेतून अनेकांनी मनोजच्या विरोधात तक्रारी देखील दाखल केल्या आहे मात्र हा महाशय शेवटी पत्रकार ठरला ना, मग अश्या पत्रकारावर कारवाई केल्यास आपली देखील पोलखोल होईलच कदाचित याच भावनेतून पोलिसांनी मोतियानी याच्यावर कारवाई केली नसेल मात्र न्यायालयाच्या अटक वारंट नंतर देखील पोलिसांनी पाठीशी घातलेल्या? मनोजवर आज चक्क एकाला जीवे ठार मारल्याचा आरोप लागलाय, आज अनेकांचा तळतळाट घेणारा मनोज आरोपीच्या पिंजऱ्यात जरी उभा राहिला असला तरी भोर कुटूंबियांच्या तळतळाटामुळे त्याला पाठीशी घालणाऱ्यांना देखील अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल एवढेच…..!