भाग 6
त्या ऑनलाईन सट्टयाचे जुने आयडी ब्लॉक ; NEWS ALERT च्या बातमीने दणाणले बुकींचे धाबे ; जुने आयडी बंद करून नव्या आयडीवर धंदा थाटण्याचा प्रयत्न!
अहमदनगर – अहमदनगर मध्ये ऑनलाईन सट्टयाने अनेकांना बरबाद केलें तर अनेकांचे मूडदे पाडले. त्यामुळे तरुण युवकांमध्ये जनजागृती करण्याकरीता NEWS ALERT ने घेतलेल्या मोहिमेत एक विशेष बाब समोर आली आहे.
NEWS ALERT ने बातम्या प्रसारीत करताच ऑनलाईन सटूडेबाज बुकींचे धाबे दणाणले आहे. नगर शहरात पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या त्या बुकीने ऑनलाईन सट्टयाची जुनी आयडी ब्लॉक केली आहे.
मात्र शॉर्टकट पैश्याच्या मोहामुळे तरुणांना उध्वस्त करण्याची सुपारी घेतलेल्या त्या बुकीने आपला धंदा सुरू रहावा यासाठी ऑनलाईन सट्टयाची जुनी आयडी बंद करून नव्या ऑनलाईन आयडीच्या माध्यमातून पुन्हा आपला धंदा पसरवीण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ऑनलाईन सट्टयाची जुनी आयडी ही ……57 अश्या आशयाची होती. विशेष म्हणजे ही आयडी फ़क्त त्या बुकीकड़ेच नव्हती. तर त्याने त्याच्या एक ना अनेक साथीदारांनां देऊन त्यांच्याकडून देखील कमिशन खाण्याचा धंदा सुरू केला होता. मात्र त्या …..57 वर खेळण्यात येणाऱ्या सट्टयामुळे उध्वस्त झाले ते फ़क्त तरुण युवक. त्यामुळे …..57 च्या सटूडेबाज बुकीची हकीकत दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आणी करत राहणारच. एवढेच नाही तर पैश्यांची पर्वते बांधणाऱ्या पर्यंत अद्याप पोलीसही पोहचू शकले नाही ते आम्ही आमच्या बातमीच्या माध्यमातून करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु अश्या सटूडेबाज बुकीची पोलिसांनी कसून चौकशी करण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सायबर विभागाने देखील तत्परता दाखवत सट्टयाच्या ऑनलाईन व्यवहारासाठी बँकेत उघडण्यात आलेले करंट अकाउंट व सट्टयाच्या माध्यमातून स्वतःला व्हाईट कॉलर म्हणून समाजात वावरण्यासाठी मूडदे पाडलेल्या तरुण युवकांवरच्या टाळूवरचा लोणी खातं बांधण्यात येणाऱ्या कन्स्ट्रक्शनची चौकशी देखील करण्याची चर्चा आता नागरिकांमधुन व्यक्त केली जात आहे.
मात्र ज्या प्रमाणे महाभारतात धर्माची रक्षा करण्यासाठी कृष्णाने कर्णाला मारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणेच अश्या सटूडेबाजांनीं कितीही नविन आयडी उघडल्या तरी तरुण पिढीला वाचविण्यासाठी NEWS ALERT कणखरपणेच्या भूमिकेत दिसेल एवढेच.
…..57 या ऑनलाईन सट्टयाच्या आयडीचा संपूर्ण व्हिडिओ पहा पुढच्या भागात __NEWS ALERT या यूट्यूब चँँनलवर……!