त्या 20 लाखाचे गुपित गुलदस्त्यातच ; कोतवाली पोलिस ठाण्यातील त्या चर्चेचा अंत कधी होणारं !
अहमदनगर – अहमदनगर शहरातील बनावट सोनं तराण घोटाळा उघडकीस करत कोतवाली पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत धमाकेदार कामगिरी केली. मात्र केलेल्या कामगिरी दरम्यान सुरू झालेल्या त्या २० लाखाच्या चर्चेचा गुपित अद्यापही गुलदस्त्यात असल्याने एसपी साहेबांनी सुरू केलेली चौकशी ही फ़क्त नावा पुरतीच होती की काय हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
बनावट सोने तारण कारवाई दरम्यान २० लाखाची तडजोड. कारवाई आधीच कारवाई न करण्यासाठी घेण्यात आली असल्याची चर्चा कोतवालीच्या त्या लाल कट्ट्यावर बसून करण्यात येत होती.
दरम्यान २० ची चर्चा सुरू होताच कोतवाली पोलिस ठाण्यातील DB शाखा बरखास्त करण्यात आली. आणी लावण्यात आली ती म्हणजे २० च्या चर्चेची चौकशी. मात्र लावण्यात आलेल्या चौकशीला महिना उलटला तरी त्याचे गुपित गुलदस्त्यातच असल्याने DB बरखास्त करून एक प्रकारे प्रकरण दडपण्याचा प्रकार तर झाला नाही ना ? असे तर्क वितर्क पोलिस वर्तुळातच लावण्यात येत आहे.
विशेष म्हणजे याचं बनावट सोने तारण प्रकरणात सुरू झालेल्या २०च्या चर्चेनंतर त्या बनावट सोने तारण प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला , तर दुसरीकडे बनावट NOC प्रकरणाच्या तपासावर देखील सामजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे त्या २० च्या चौकशीच गुपित गुलदस्त्यात असल्याने कोतवाली पोलिस ठाण्यातील तिन्ही प्रकरणात वरिष्ठांनीं घेतलेल्या भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत वेगवेगळ्या तर्कवितर्कनां उधाण आलं आहे !