महामार्ग आडवून धिंगाणा घालणाऱ्या त्या टवाळखोरांना वर अखेर कारवाई.
भिंगार कॅम्प पोलिसांनी केला अकरा जणांवर गुन्हा दाखल.
लगनसमारंभातील हळदी कार्यक्रमात नगर-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल अशोका समोर वाहने आडवी उभी करून धिंगाणा घालणाऱ्या अकरा टवाळखोरांना विरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होता हा गुन्हा दाखल केला आहे .पोलीस नाईक शफी शेख यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
18 मे रोजी नगर औरंगाबाद रोड वरील अशोका हॉटेल समोर रात्री दहा वाजता हळद कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी न घेता अशोका हॉटेल समोरील महामार्गावर टवाळखोर लोकांनी स्वतःची वाहने आडवी उभी करून महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केला होता. फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला होता. धिंगाणा घालून लोकांना जाणीवपूर्वक त्रास होईल असे वर्तन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत व्हायरल झालेल्या व्हिडीओ च्या आधारावर भिंगार कॅम्प पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फैजान निसार जहागीरदार, फैजान हमीद जहागीरदार, मजर मिर्झा, मोहम्मद जीशान जहागीरदार, सोहेल शेख, अश्रफ नदीम जहागीरदार, सलमान शेख, रेहान कुरेशी, आजीम सिमलावाला, इजान शेख, कलीम सादिक जागीरदार (सर्व राहणार झेंडीगेट नगर) या आरोपींविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बीएस म्ह्स्के करीत आहेत.
( बातम्यांसाठी संपर्क=9112307272)