Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in /home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line 40
अहमदनगर – अहमदनगर शहरात सध्या शहर वाहतूक शाखेच्या कारनाम्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र होणारी हि चर्चा खरी कि खोटी यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनि सखोल चौकशी करण्याची गरज आहे. शहर वाहतूक शाखेच्या आवारात असलेल्या बेवारस – भंगार वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव न करता शहरातील काही भामट्यांच्या मध्यस्थीने त्या वाहनांना वाहतूक शाखेच्या कारभाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. वाहतूक शाखेच ठाणं असो किंवा पोलीस स्टेशन प्रत्येक पोलीस ठाण्यात तुम्हाला बेवारस तसेच गुन्ह्यात वापरलेली शेकडो वाहने पडलेली दिसतात हि वाहने बेवारस असल्याने कोर्टाच्या आदेशाने अश्या वाहनांचा लिलाव कायदेशीर प्रक्रियेद्वारे होत असतो मात्र शहर वाहतूक शाखेच्या कारभाऱ्यानी शहरातील त्या दलालांना हाताशी धरून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता परस्पर बेवारस – भंगार वाहनांची विक्री केल्याची एकच चर्चा शहरात सुरु आहे. शेकडो वाहनांच्या माध्यमातून मिळालेला मलिद्याची चव वाहतूक शाखेच्या कारभाऱ्यांसह त्या दलालांनीही चाखली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे गावभर उधाण आलेल्या या चर्चावर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे….
खरंतर शहर वाहतूक शाखेच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस वाहने पडलेली होती, या वाहनांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते याबाबत न्यूज अलर्टने वृत्त प्रसारित करताच तोफखाना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असलेली बेवारस वाहने उचलून नेली होती मात्र वाहतूक शाखेच्या ताब्यात असलेल्या त्या वाहनांची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता परस्पर व्हिलेवाट लावण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे वाहनांची परस्पर विक्री करण्यासाठी वाहतूक शाखेच्या त्या कारभाऱयांनी शहरातील त्या दलालांची मदत घेतल्याची चर्चा होत आहे. एवढेच नव्हे तर मदत करणारे दलाल देखील तितकेच हुशार व त्यांच्या कारनाम्याचे किस्से देखील एक ना अनेक असल्याने या संपूर्ण प्रकरणाची जिल्ह्याच्या प्रमुखांनि चौकशी करावी अन्यथा पोलिसांची आबरू वेशीला टांगल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की…..
9000