अहमदनगर – पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या संपर्क कार्यालयाचा उदघाटन शनिवारी करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी कुरेशी समाजाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील हे मंत्रीपदावर विराजमान होताच अहमदनगर जिल्ह्यातील एक ना अनेक प्रश्न मार्गी लागले. मात्र शहर आणी उपनगरातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी आता मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू केलें आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिकांना सोईस्कर झालें असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पालकमंत्री विखेपाटील यांचा नगर शहरात संपर्क कार्यालय नसल्याने शहरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असे मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात पालकमंत्र्याचा कार्यालय सुरू झाल्याने आता शहरातील नागरिकांसह कुरेशी समाजाच्या नागरिकांना देखील सोपे झालें असल्याच यावेळी सांगण्यात आलं आहे.
दरम्यान शहरात नव्याने पालकमंत्री संपर्क कार्यालय सुरू झाल्याने कुरेशी समाजाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्यास कुरेशी, अब्दुल हक कुरेशी, हाफिज कुरेशी, नफिस कुरेशी यांच्यासह समाजातील नागरीक उपस्थित होते