अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मानस महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. भिंगार येथे चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली.
मानस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली भिंगार येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कोषाध्यक्ष मंगेश मोकळ, संघटक अर्जुन चव्हाण, सचिव अकील शेख, रिपाई आठवले गट युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे, राष्ट्रवादी काँग्रेस भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, शहर जिल्हा सरचिटणीस मारुती पवार, महासंघाचे कार्याध्यक्ष समीर सय्यद, महर्षी वाल्मीक स्वामी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण घावरी, प्रशांत पाटोळे, आमदार संग्राम भैय्या जगताप युवा मंच अध्यक्ष पै.सागर चवंडके, छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.विजय नामदे, रामराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल देवतरसे, राजु जंगम, रिपाई आठवले गटचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे, रिपाईचे आयटी सेलचे भिंगार अध्यक्ष विक्रम चोहान, ओमकार फिरोदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत झोडगे, पै. सागर लालबोंद्रे, पै.दिनेश लंगोटे, रोहित घाडगे, संजय माणकेश्वर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मानस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार म्हणाले की, राज्यपालापासून भाजपचे मंत्री व नेते राष्ट्रपुरुषांबाद्दल वारंवार वादग्रस्त विधान करुन त्यांची चेष्टा करत आहे. महापुरुषांबद्दल चुकीचे विधान करुन समाजात असंतोष पसरविण्याचे काम केले जात आहे. अशा वाचाळवीरांनी खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा उध्दार करणार्या महापुरुषांबद्दल केले गेलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगून भिंगार परिसरात छत्रपती शिवाजी महाराज की जय क्रांतीज्योती महात्मा फुले यांचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो अशा प्रकारे घोषणा देऊन परिसर दणाणून गेला व भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.