महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत असून आज राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंंदे गटाला मिळाले आहेत. तर खासदार नवनीत राणा यांच्यावर दिपाली सय्यद यांनी टीका केली आहे. राणा बाई थोडी कळ काढा सुट्टीवर गेलेली पोरं परत येतील असं सय्यद यांनी म्हटलं आहे.
“राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतून सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे…” असं ट्वीट दिपाली सय्य्द यांनी केलं आहे.
महाराष्ट्र सोडून ढुं….ला पाय लावून पळालेल्यांना आम्ही संरक्षण देणार नाही. आमदारांना संरक्षण असतं, त्यांच्या कुटुंबियांना नसतं.” असं शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते त्यानंतर राणा यांनी त्यांच्यावर टीका केली होती. “संजय राऊत हे जबाबदार व्यक्ती असताना म्हणतायत की आमदारांना संरक्षण आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे संजय राऊतजी? की आपण त्यांच्या परिवारांना मारताय, जो परत नाही आला त्यांच्या परिवाराला मारण्याची सरळसरळ धमकी तुम्ही देताय” अशी टीका राणा यांनी केली होती. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.