इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे पुढील शैक्षणिक वाटचाली चा भक्कम पाया (माणिकराव विधाते)
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष अब्दुल खोकर यांच्या वतीने पी ए इनामदार स्कूल मधील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . आयोजित या सत्कार समारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष अब्दुल खोकर यांच्यासह पी ए इनामदार स्कूलचे मुख्याध्यापक हारून खान सर, उपमुख्याध्यापिका फारहाणा शेख उपस्थित होत्या.
अशा प्रकारच्या सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबद्दल अधिक आवड निर्माण होते व पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळते या दृष्टिकोनातून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर उपाध्यक्ष अब्दुल खोकर यांनी सांगितले. तर दहावीची परीक्षा पुढील शैक्षणिक वाटचाली चा भक्कम पाया असून या परीक्षेमुळे पुढील शैक्षणिक दिशा ठरते . अपयश ही यशाची पहिली पायरी असून अपयश आल्यावर विद्यार्थ्यांनी खचून न जाता पूर्व जोमाने पुन्हा परीक्षेची तयारी करावी, असे मत व्यक्त करत पीए इनामदार स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी शुभेच्छा दिल्या.
आयोजित या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी पीए ईनामदास स्कूलमधील इयत्ता दहावीतील सय्यद मरियम मुदस्सर (94%), खान शाफिया छोटू (91.60%), शेख रिजा फातेमा रफिक (90. 80 %) या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.