अहमदनगर प्रतिनिधी:- प्रस्तुत बातमीतील हकीकत अशी की अमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात सन १९९४ ते २०१६ पर्यन्त ३२ गुन्ह्यात एकूण ७९८ किलो १०८ ग्रॅम गांजा,भांग,गर्द जप्त करण्यात आला होता.नमूद गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करून मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते मा.न्यायालयात नियमित सुनावणी होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मा.न्यायालयाने मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश दिले होते.मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडील आदेशान्वये श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली श्री.सौरभ कुमार अग्रवाल (सदस्य)तथा अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.संजय नाईकवाडी पाटील (सदस्य) तथा पोलीस उपाधीक्षक गृह अहमदनगर,श्री.अनील कटके (सदस्य) तथा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार/ विष्णू घोडेचोर,पोहेकॉ/ भाऊसाहेब कुरुंद,पोहेकॉ/ सखाराम मोटे,पोहेकॉ/देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,पोकॉ/जयराम जंगले,चापोहेकॉ/भरत बुधवंत व पोहेकॉ/ बबन बेरड,अहमदनगर जिल्ह्यातील सन १९९४ ते १०१६ पर्यन्त ३२ गुन्हयातील प्रलंबित असलेला अमलीपदार्थ नाश करण्याचे योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोमवार दि.२७/०६/२०२२ रोजी रांजणगाव एमआयडीसी जिल्हा पुणे येथील कंपनीत नाश केला आहे.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर,श्री.मेघशाम डांगे पोलीस उपअधीक्षक गृह,श्री.अनील कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी पूर्ण केलेली आहे.