अहमदनगर प्रतिनिधी:-मदरशांना पायाभुत सुविधा व शिक्षकांचे मानधन देण्यासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविली जाते.या योजनेसाठी इच्छुक मदरशांनी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत जिल्हानियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे अर्ज करावा.असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेचे सदस्य सचिव निलेश भदाणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.या योजनेत मदरशांच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधनगृह उभारणे / डागडुजी करणे, विद्यार्थ्यासाठी आवश्यक फर्निचर, मदरसांच्या निवासस्थानात इन्वर्टरची सुविधा निर्माण करणे, मदरसांच्या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स, प्रयोगशाळा साहित्य सायन्स कीट मॅथेमॅटिक्स कीट व इतर प्रयोगशाळा या सुविधांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.सदर योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरशांना केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत (Scheme for Providing Quality Education in Madrasa – SPQEM) लाभ मिळालेला आहे. अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. मदरशांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी विषयांचा अभ्यासक्रम राज्यशासनाच्या अन्य शाळांप्रमाणेच राहील. तसेच मदरशांमध्ये शिकविणा-या शिक्षकांचे प्रतिदिन ५ तासिका याप्रमाणे कामाचे तास निश्चित करण्यात येतील.या योजनेचा शासननिर्णय व अर्जाचा नमूना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची अंति मुदत असून त्यानंतर कोणतही मुदतवाढ दिली जाणार नसल्याची माहिती ही श्री.निलेश भदाणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे