शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. ४८ तासांमध्ये त्यांना आपली भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना राजकारणात पहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भन्नाट ट्विट करत पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो ट्वीट करत ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत राऊत यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे.
नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला फोटो संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार? कधीतरी मुंबईत यावचं लागेल, असं ट्वीट करत राऊत यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.