नगर येथील वाडिया पार्क मध्ये पै.हर्षवर्धन सदगीर व कोल्हापूरची पै.रेश्मा माने झाले छत्रपती शिवराय चषकाचे मानकरी….
अहमदनगर प्रतिनिधी – वाडीया पार्क मैदानात रंगलेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली.किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून तसेच नेतृत्वाखाली छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा नगरमध्ये पार पडल्या.महिला व पुरुष गटाच्या अंतिम लढतीसाठी महसूल मंत्री ना.थोरात यांच्यासह क्रीडामंत्री ना.सुनील केदार,आ.डॉ.सुधीर तांबे,आ.लहू कानडे कुस्तीगीर परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष काका पवार, पै.वैभव लांडगे, हिंद केसरी पै.योगेश दोडके,ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा,अनिस चुडीवाला,प्रवीण गीते, सागर चाबुकस्वार,मा.विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, दत्ता खैरे,संदीप दातरंगे,पै.संभाजी लोंढे,पै.हर्षवर्धन कोतकर,नगरसेवक पै.संग्राम शेळके आदींसह नगर शहरासह नगर तालुका व जिल्ह्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी ना.थोरात म्हणाले की किरण काळे दुःखात असल्यामुळे स्पर्धा कशी होणार अशी काळजी होती मात्र काळे यांनी तयार केलेल्या शहरातील नव्या दमाच्या फळीने त्यांच्या मागे स्पर्धा ही यशस्वी केली.स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांचे बंधू सागर यांचे आकस्मिक निधन झाले.त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.तरीही या स्पर्धेत व खेळाडूंना व्यत्यय येऊ न देण्याची सूचना स्वतःकिरण काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.त्यानुसार स्पर्धा यशस्वी पार पडली.महसूलमंत्री थोरात व क्रीडामंत्री ना.केदार यांनी काळे यांचे नेतृत्वाचे यावेळी कौतुक केले. बातम्यांसाठी संपर्क 9112307272