अहमदनगर – अहमदनगर शहर परिसरातील सर्जेपुरा या ठिकाणी दोन गटांमध्ये मारामाऱ्या झाली असल्याची घटना ताजी असतानाच शहरातील मुकुंद नगर या उपनगरामध्ये देखील राहत्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे मुकुंदनगर येथील इरफान शेख फॅब्रिकेशन वाले यांच्या घरावर तुफान दगडफेक करत त्यांच्या चार चाकी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे एवढेच नव्हे तर मुकुंद नगर याच ठिकाणी दगडफेक करणाऱ्या या टोळक्याने ठिकठिकाणी दोन ते तीन जणांना जबर मारहाण केल्याची घटना देखील घडली आहे
सर्जेपुरानंतर मुकुंद नगर मध्ये घडलेल्या हाणामारीच्या या घटनेमुळे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे पोलीस प्रशासनाकडून पाहिजे तशी ठोस कारवाई होत नसल्यामुळे गुंडांना पोलिसांचा अजिबात धाक राहिला नाही आणि त्यामुळेच मुकुंद नगर सारख्या उपनगरामध्ये देखील गावगुंड हे दहशत पसरवित असल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे
खरंतर शहराच्या मुकुंदनगर या उपनगरामध्ये टोळक्यामध्ये शीतयुद्ध हे नेहमीच पाहायला मिळाले मात्र आज राहत्या घरावर दगडफेक करून त्याचप्रमाणे दगडफेक करण्यापूर्वी देखील वाबळे कॉलनी परिसरात एक ते दोन युवकांना जखमी करून नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दहशत पसरविणारी ही टोळी पोलिसांना देखील बंद पाकिटात ठेवल्यासारखे वागणूक देत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे अशा गावगुंडांवरती पोलीस काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
मुकुंद नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून एक ना अनेक गावगुंड सामान्य नागरिकांवर दहशत पसरविताना दिसत आहे मात्र भिंगार कॅम्प पोलीस हे थातूरमातूर प्रतिबंधात्मक कारवाई करत असल्यामुळे अशा गावगुंडांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आता भिंगार कॅम्प पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या घरावर दगडफेक करून दहशत माजविणाऱ्यांवर 307 कलमान्वये गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे